मित्राच्या ‘शेवटच्या कॉल’मुळे आयआयटी विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा उलगडा होणार का?

मुंबई: आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्या प्रकरणात डिजिटल पुरावे गोळा केल्यानंतर, गुन्हे शाखेने आता त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, वाकोडेने फोनवर एका मित्राला सांगितले होते की, त्याला थर्मोडायनामिक्स थिअरीच्या पेपरमध्ये कमी गुण मिळाले होते आणि तो अस्वस्थ होता. त्याने असेही सांगितले की, परीक्षेदरम्यान तो कॉपी करताना पकडला गेला होता. मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत सहा विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन त्यांचे जबाब नोंदवले आहेत.

यापैकी, वाकोडेसोबत शेवटच्या कॉलवर असलेल्या विद्यार्थ्याने सांगितले आहे की, संभाषणादरम्यान वाकोडे तणावग्रस्त दिसत होता. आतापर्यंतच्या तपासलेल्या सामग्रीमध्ये तपास अधिकाऱ्यांना तणाव किंवा त्रासाची कोणतीही स्पष्ट चिन्हे आढळलेली नाहीत. साहिल रवींद्र वाकोडे याने १८ सप्टेंबर रोजी, परीक्षेच्या काही तासांनंतर, त्याच्या वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केली. वाकोडे हा बी.टेकच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, वाकोडेला हॉलमधून बाहेर जाण्यास सांगितले होते आणि नंतर तो परत आला. हे फुटेज फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहे.

गुन्हे शाखेची पथके वाकोडेचा आयफोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून त्याचे शेवटचे कॉल, संदेश आणि इतर डेटा मिळवता येईल. पोलिसांनी सांगितले की, ते विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवित आहेत आणि लवकरच परीक्षेदरम्यान उपस्थित असलेले प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांचाही जबाब नोंदवतील. दरम्यान, साहिल वाकोडेच्या मृत्यूच्या परिस्थितीची चौकशी करणाऱ्या १० सदस्यीय समितीने संस्थेच्या नियामक मंडळाकडे एका आठवड्याची मुदतवाढ मागितली आहे. साहिलचे वडील, रवींद्र, यांनी आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

घटनाक्रम

* ८ सप्टेंबर २०२६ रोजी, मुंबईतील आयआयटी बॉम्बेच्या पवई कॅम्पसमधील बी.टेकच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याने आपल्या वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली
* मध्य-सत्र परीक्षेत मोबाईल फोन आणि चॅटजीपीटीचा वापर करून कॉपी केल्याचा आरोप साहिलवर होता
* परीक्षा हॉलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्राध्यापक सूर्यनारायण दुला साहिलला परीक्षा हॉलमधून बाहेर जायला सांगताना दिसत होते
* साहिलच्या पालकांनी संस्थेवर जातीय छळ आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत
* राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. सूर्यनारायण दुला यांचा जबाब अद्याप नोंदवायचा आहे
* मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह सुमारे २० जणांचे जबाब नोंदवले आहेत
* साहिल वाकोडेला कॉपी करताना पकडणाऱ्या प्राध्यापक सूर्यनारायण दुला यांचा जबाब अद्याप नोंदवायचा आहे
* साहिलचा पॅटर्न-लॉक असलेला आयफोन तपासातील एक महत्त्वाचा दुवा असून, तो अनलॉक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत
* त्याच्या मृत्यूपूर्वी, साहिलने त्याच्या मैत्रिमीशी फोनवर बोलताना सांगितले होते की, फसवणूक करताना पकडले होते. आपल्याकडून ती चूक झाली होती

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!