नाशिक! डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात प्रेमाचा अनैतिक अँगल; तू तुझ्या नवऱ्याला आवडत नाही…

नाशिक : नाशिक शहरातील बहुचर्चित डॉक्टर मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळालं आहेत. 6 मार्च 2026 रोजी डॉ मनीषा यांचा राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला होता. मृत मनिषा यांच्या पतीनंतर डॉ. निलेश याची मैत्रीण जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्वाती चव्हाण हिला पोलिसांनी अटक केल्याने या प्रकरणाला वेगळच वळण मिळाले आहे. दरम्यान, न्यायालयाने डॉ. स्वाती चव्हाणला 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

डॉ. निलेश जेजुरकर यांना अटक केल्यानंतर पोलीस चौकशीत डॉक्टर स्वाती चव्हाण यांच्यासोबत प्रेम संबंध असल्याची कबूल दिल्याने स्वाती चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत डॉ. मनीषा यांच्या माहेरच्यांकडून तिचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. निलेश जेजुरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, याप्रकरणी निलेश जेजुरकर फरार होता त्यांनी नाशिक सत्र न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जामीन मिळवण्यासाठी धाव घेतली. मात्र, हायकोर्टात त्यांचा जामीन कोर्टाने नामंजूर केला आणि पोलिसांना शरण जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर निलेश जेजुरकरला पोलिसांनी अटक केली आणि निलेश जेजुरकरच्या अटकेनंतर आता डॉक्टर स्वाती चव्हाण यांना अटक केल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांकडून दोघांना अटक करत स्वाती चव्हाण यांचा मोबाईलही जप्त केला. डॉक्टर स्वाती आणि डॉक्टर निलेश यांच्यात प्रेम संबंध असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र, या सगळ्या प्रकरणात आत्तापर्यंत सलग नऊ वेळा डॉक्टर स्वातीची पोलिसांनी चौकशी केली होती. मात्र, आता पुन्हा या सगळ्या प्रकरणांमध्ये ठोस कोणताही पुरावा नसल्याचा युक्तिवाद डॉक्टर स्वाती चव्हाणचे वकील ॲड. अविनाश भिडे यांनी केला आहे.

दरम्यान, डॉ. मनीषा जेजुरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचे पती निलेश जेजुरकर यांना पोलिसांनी अटक केली होती आणि पोलिसांच्या चौकशीत डॉक्टर स्वाती चव्हाण यांच्यासोबत प्रेम संबंध असल्याची कबुली निलेश यांनी दिली. मात्र, या सगळ्या प्रकरणांमध्ये तू तुझ्या नवऱ्याला आवडत नाही तुझं शिक्षण कमी आहे असे बोलून डॉक्टर स्वाती या मनीषा जेजुरकर यांना टॉर्चर करत होत्या आणि याच खेळातून त्यांनी आत्महत्या केलाचा आरोप कुटुंबाने केला आहे. मात्र या सगळ्या प्रकरणांमध्ये दोन्ही आरोपी पोलिसांनी जेरबंद केल्याने समोरासमोर या दोघांची चौकशी करायची आहे आणि या प्रकरणांमध्ये जे काही सीसीटीव्ही व्हिडिओ आणि मोबाईल मधील डाटा रिकवरी नंतर दोघांमधील नेमके संबंध काय आणि डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी आत्महत्या केली का या दोघांनी डॉक्टर मनीषा यांचा खून केला या संदर्भात खुलासा होईल, अशी प्रतिक्रिया मनीषा यांच्या माहेरच्यांकडून देण्यात येत आहे.

नाशिक! महिला डॉक्टरच ठरली मनीषा जेजुरकरांच्या मृत्यूला कारण; प्रेमसंबंध…

नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणी माहेरच्यांकडून गंभीर आरोप…

नाशिक! प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या…

नाशिक! प्रसिद्ध डॉ. मनिषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…

नाशिक! विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वळण, रिसॉर्टवर प्रियकराने घेतला जीव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!