संतापजनक! शाळेच्या स्कुल बसमध्ये चिमुकलीसोबत अश्लिल कृत्य…

पनवेल : एका शाळेच्या स्कुल बसमध्ये अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीसोबत अश्लिल कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे पनवेल शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बसचालकाला (वय ३०) अटक केली असून, पनवेल न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपी संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या खासगी बसचा चालक होता. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यानं कामोठे येथील बालवाडी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी बसमधून प्रवास सुरू केला. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर बसमध्ये संबंधित तीन वर्षांची चिमुकली एकटी राहिली. त्यावेळी आरोपी चालकाने तिच्यासोबत कथितरित्या गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

घरी पोहोचल्यानंतर चिमुकलीने पोटदुखीची तक्रार केली. त्यानंतर तिने आपल्या आजीला बसमधील चालकाने तिच्यासोबत चुकीचं कृत्य केल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच आजीने शाळा व्यवस्थापनाला याबाबत कळवलं आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये लैंगिक अत्याचाराची पुष्टी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात १२ वर्षांखालील मुलीवरील बलात्कारासंदर्भातील भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीला गुरुवारी पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बालिकेवर लैंगिक अत्याचार; दिल्लीत टॅक्सी चालकाला अटक

पुणे! भोंदूबाबावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप; मुलींना मांडीवर बसवतो…

पुणे! अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने कॅफेमध्ये केला लैंगिक अत्याचार अन्…

शाळा सुटताच अल्पवयीन मुलीचे केले अपहरण अन् निर्जनस्थळी…

मुलींना नको तिथे हात लावायचा, आदिवासी आश्रम शाळेतील 21 विद्यार्थिनींचा विनयभंग…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!