धक्कादायक! डॉ. नवरा मृतावस्थेत तर मुलगा रक्तबंबाळ अन् पत्नी मोबाईलमध्ये व्यस्त…

धारवाड (कर्नाटक): धारवाड शहरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणारे भूलतज्ज्ञ डॉ. किरण होन्नावर यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला, तर त्यांचा 8 वर्षांचा मुलगाही घरात जखमी अवस्थेत सापडला. पोलिसांनी जखमी मुलाला रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत डॉ. किरण होन्नावर (वय 45) हे धारवाडमधील पवन हायस्कूलसमोरील एका अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर पत्नी डॉ. प्रियंका कट्टनहल्ली आणि मुलासोबत राहत होते. डॉ. किरण हे एका खासगी रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते, तर त्यांची पत्नी, डॉ. प्रियंका या नेत्ररोगतज्ज्ञ असून त्यांनी ऑफ्थॅल्मॉलॉजीमध्ये एमएस पदवी प्राप्त केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिस आयुक्त एन. शशिकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. किरण यांच्याशी बुधवारी त्यांच्या नातेवाईकांनी तसेच मित्रांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्यांचा फोन पत्नी प्रियंका यांनी उचलला. डॉ. किरण विश्रांती घेत आहेत, ते ड्युटीवर गेले आहेत, अशी विविध उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र यामुळे संशय वाढला आणि पोलिसांना याप्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फ्लॅटमध्ये प्रवेश केला. फ्लॅटच्या एका खोलीत डॉ. किरण हे मृतावस्थेत आढळलेला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी होऊन खाली पडलेला होता. मात्र मुलाचे श्वासोच्छ्वास सुरू असल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घरात एकीकडे डॉक्टर पतीचा मृतदेह तर दुसरीकडे मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत होता. पण, डॉ. प्रियांका ही बेडवर झोपून मोबाईल वापरत होती. यामुळे पोलिसांनी धक्का बसला. प्राथमिक तपासानुसार, घटना घडली त्या वेळी फ्लॅटमध्ये केवळ पती, पत्नी आणि त्यांचा मुलगा उपस्थित होता. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण काय, हल्ला कधी झाला आणि त्याआधी किंवा त्यानंतर काय घडले, याचा तपास सुरू आहे. तपासादरम्यान मुलाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळल्या आहेत. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ण झाल्यानंतरच हत्येमागील नेमके कारण समजू शकेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हृदयद्रावक! माहेरी जाताना नववधूचा भीषण अपघातात मृत्यू…

पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा होर्मुझच्या समुद्रात धक्कादायक शेवट; शेवटचा फोन…

धक्कादायक खुलासा! अस्मिताने एअर इंडियाची नोकरी सोडली; लग्नात डान्स केला नाही म्हणून छळ अन्…

महाराष्ट्रातील सुपुत्र अखेरच्या प्रयत्नात झाला IPS अन् दिला राजीनामा…

धक्कादायक! आरोपीवर बलात्काराचा गुन्हा अन् कारागृहातून बाहेर येताच 6 जणांना संपवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!