
महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल…
मुंबई : महिलेवर अत्याचार केल्याची प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांच्या बँड्स पथकात दाखल करुन घेण्याचं आमिष दाखवत दोन पोलिसांनी महिलेवल अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस भरती आणि बँड्समन भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार आणि बँड पोलिस कॉन्स्टेबल मारुती करे यांच्यावर बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पोलिस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार हे दौंड येथील राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत असून दुसरा आरोपी मारुती करे हा मुंबई बँड पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.
View this post on Instagram
पोलिस दलातील आरोपींनी पीडितेचा विश्वास संपादन करून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संबंधित पीडीतेने पोलिसात धाव घेतली होती. मात्र, त्या ठिकाणी दाद न मिळाल्याने संबंधित पीडिता न्यायालयात गेली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कोल्हापूरमध्ये प्रेमविवाहाचा भयानक शेवट; संशयावरून पत्नीला संपवलं अन् मारला मिशीवर ताव…
नांदेड! पती-पत्नीचे मध्यरात्री जोरदार भांडण अन् तीन राऊंड गोळीबार…
प्रियकराच्या सांगण्यावरून नर्सने केला नवऱ्याचा सलाईनमधून क्रुर मर्डर…
पुणे! प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध पत्नीला समजले अन्…
वर्षभरापूर्वी विवाह! तू काही कामाचा नाहीस, पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

