
अनैतिक संबंधाचा संशय अन् आमच्या महिलांच्या पाठीमागे लागला आहेस काय म्हणत…
सोलापूर: “तू आमच्या मुलींची छेड काढतोस, आणि आता आमच्या घरातील महिलांच्याही पाठीमागे लागला आहेस,” असा आरोप करत घरासमोरील अंगणात झोपलेल्या एका युवकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या मोहोळ तालुक्यातील एका गावात करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
युवराज अशोक व्यवहारे (वय 27) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत 12 तासांच्या आत दत्ता अण्णा पवार, प्रशांत बाळू शिंदे, अण्णा हरिदास पवार, अंबिका अण्णा पवार या चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
View this post on Instagram
मृत युवराज व्यवहारे हा दोन वर्षांपूर्वी वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनावर चालक म्हणून काम करत होता. या दरम्यान त्याची एका महिलेशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर अनैतिक संबंधात झाल्याचा संशय महिलेच्या नातेवाईकांना होता. यावरून पूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता, मात्र तो वाद पोलिस ठाण्यात आपापसात मिटवण्यात आला होता. सोमवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास युवराज आपल्या घरासमोरील अंगणात झोपला असताना आरोपींनी तिथे येऊन त्याला गाठले. “तू आमच्या महिलांच्या पाठीमागे लागला आहेस,” असे म्हणून शिवीगाळ करत आरोपींपैकी दोघांनी युवराजवर चाकूने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवराजचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी मृत युवकाचे वडील अशोक निवृत्ती व्यवहारे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
सोलापूरमध्ये मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांसह संपवलं; कारण आलं समोर…
सोलापूर हादरलं! दिराने मधरात्री घरात घुसून वहिनीसह 2 पुतण्यांना तलवारीनं भोसकलं…
सोलापूर! प्रसिद्ध उद्योजकाने १७व्या मजल्यावर जात हात जोडत डोळे मिटले अन्…
सोलापूर! पोलिस पत्नीने शेवटचा मेसेज करून उचललं टोकाचं पाऊल…

