
हृदयद्रावक! मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू…
सातारा: मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना निरा-मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा परिसरात येथे घडली आहे. सेजल ज्ञानेश्वर बोरडे (वय 17) आणि अक्षरा ज्ञानेश्वर बोरडे (वय 15) अशी मृत बहिणींची नावे आहेत. तर लहान भाऊ पवन (वय 12) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे फलटणसह मुरूम परिसरात शोककळा पसरली आहे.
फलटण तालुक्यातील मुरूम येथून तिघे भावंडे दुचाकीवरून शनिवारी सायंकाळी मामाच्या गावाला निघाले होते. बारामती तालुक्यातील मुर्टी हे त्यांच्या मामाचं गाव आहे. निरा-मोरगाव राज्य मार्गावर चौधरी फाटा येथे आले असता त्यांची स्कुटी आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर टेम्पोने स्कुटीला काही अंतरापर्यंत फरपटत नेले. त्यामुळे दुर्घटनेची तीव्रता वाढली आणि सेजल व अक्षरा या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर अवस्थेत असलेल्या पवन याला तातडीने बारामती येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
View this post on Instagram
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचं भीषण स्वरूप पाहून सगळेच हादरून गेले होते. याबाबत पोलिसांना कळवताच वडगाव निंबाळकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, मामाच्या गावाला आनंदाने निघालेल्या भावंडांसोबत घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आई-वडिल आणि नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. सेजल बारावीत शिकत होती. तर अक्षरा दहावीत गेली होती. दोघीही अभ्यासात हुशार होत्या. भविष्यात शिक्षण घेऊन एअर होस्टेस बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं. मात्र, नियतीने घात केला आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पवन देखील यंदा सहावीत गेला असून त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हृदयद्रावक! चुलीवर मटण शिजत असतानाच मित्रांवर कोसळली वीज…
हृदयद्रावक! बार्शीत क्रिकेटचा पीच तयार करताना रोल गेला अंगावरून…
हृदयद्रावक! पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी जाऊन घेतला जगाचा निरोप…
हृदयद्रावक! उच्चशिक्षित महिलेने विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य…
हृदयद्रावक! आईसोबत कपडे धुण्यासाठी गेले अन् कुटुंबातील तिंघाचा झाला मृत्यू…

