
पुण्यातील तीन अमेरिकन नागरिकांविरुद्ध पोलिसांचे कडक पाऊल, भारत सोडण्याचा आदेश; कारण…
पुणे: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून खळबळ उडाली असतानाच आता पुण्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेले तीन अमेरिकन नागरिक एका धर्माचा प्रसार करताना आढळून आल्यानंतर त्यांना १० मे च्या आत देश सोडून देण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
तीन अमेरिकन नागरिक टुरीस्ट व्हीजा मिळवून काही दिवसांपूर्वी भारतात आले होते. पिंपरी चिंचवड मधील एका हॉटेलमध्ये त्यांनी २६ एप्रिलला मुक्काम केला. २७ तारखेला ते पुण्यातील शुक्रवार पेठेत आले. त्यावेळी त्यांच्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत छापण्यात आलेली पत्रके होती. शुक्रवार पेठेतील एका ड्रायव्हरला त्यांनी त्यातील एक पत्रक देऊन ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा कसा चांगला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्या ड्रायव्हरने तिथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर त्या तीन अमेरिकन नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना विशेष शाखेत नेण्यात आले. तिथे त्यांच्याकडे चौकशी केली असता ते धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले. टुरिस्ट व्हीजावर भारतात आलेल्या परदेशी नागरिकांना धर्मप्रसार करण्यासाठी कायद्याने मनाई आहे. तरीही ते धर्मप्रसार करत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही हे तीन अमेरिकन नागरिक कधी टुरिस्ट तर कधी बीझनेस व्हीजावर भारतात आल्याचे त्यांच्या पासपोर्ट वरुन दिसून आले आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पर्यटक व्हिसावर भारतात येऊन धर्माचा प्रसार आणि प्रचार केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी तीन अमेरिकन नागरिकांना ‘लीव्ह इंडिया’ (भारत सोडा) नोटीस बजावली आहे. व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या तिघांनाही १० मे २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परदेशी नोंदणी कार्यालयाचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले की, ‘इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ॲक्टमधील तरतुदींनुसार, व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या तिघांना ‘लीव्ह इंडिया नोटीस’ देण्यात आली आहे.” यापूर्वी जुलै २०२५ मध्येही पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका ४१ वर्षीय अमेरिकन नागरिकाला अटक केली होती. तो व्यक्ती आर्थिक मदतीचे आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तपासात समोर आले होते. तो २०१६ पासून टुरिस्ट आणि बिझनेस व्हिसावर येत होता, मात्र कोणताही व्यवसाय न करता केवळ धार्मिक प्रचार करत असल्याचे आढळले होते.’
पुणे शहरातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई…
Video! पुणे जिल्ह्यात टोळक्याने युवकाला बोनेटवरुन फरफटत नेलं अन्…
पुणे! युवकानं PMPML बस का पळवली? पोलिस तपासात धक्कादायक माहिती…
पुणे शहरात किरकोळ वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…
पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…

