
पुणे! लग्नासाठी चक्क पोलिस अधिकारी झाल्याचा बनाव! इम्प्रेशनसाठी लावले खोटे फ्लेक्स…
पुणे: लग्न जमत नसल्याने मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी एका युवकाने चक्क पोलीस अधिकारी झाल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक आणि हास्यास्पद प्रकार उघडकीस आला आहे. ऋषिकेश राजू जाधव (वय २६, रा. नऱ्हे रोड) असे या युवकाचे नाव आहे.
पुणे शहर पोलीस दलात रुजू झाल्याचे खोटे फ्लेक्स शहरभर लावून आणि व्हॉट्सअॅपवर वर्दीतील फोटो ठेवून ‘इम्प्रेशन’ मारण्याचा या युवकाचा खटाटोप अखेर त्याच्याच अंगलट आला आहे. लग्न जमत नसल्याने स्वतःला पुणे पोलीस दलात रुजू झाल्याचे भासवून फ्लेक्स लावणाऱ्या युवकाविरुद्ध नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकाच वेळी धक्का आणि चर्चेला उधाण आले आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश जाधव याने आपण पुणे शहर पोलीस दलात भरती झाल्याचे भासवण्यास सुरुवात केली. केवळ लोकांशी खोटे बोलून तो थांबला नाही, तर त्याने स्वतःच्या अभिनंदनाचे मोठमोठे फ्लेक्स शहरात विविध ठिकाणी लावले. एवढेच नव्हे, तर पोलीस गणवेशातील (वर्दीतील) स्वतःचे फोटो मोबाईलच्या ‘व्हॉट्सअॅप स्टेटस’ला ठेवून नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये रुबाब मारण्याचा प्रयत्न केला. ‘पोलीस अधिकारी’ झाल्याचे दाखवून थेट लग्नाची लाईन लावण्याचा त्याचा हा ‘फिल्मी प्लॅन’ होता. ऋषिकेश जाधव याने शहरातील विविध ठिकाणी स्वतःच्या नावाचे व पोलीस गणवेशातील छायाचित्र असलेले फ्लेक्स लावून “पुणे पोलीस दलात निवड” झाल्याचा आभास निर्माण केला. तसेच त्याने गणवेशातील फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवून लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. लग्न जमत नसल्यामुळे मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याची माहिती समोर आली आहे. पण, पोलिसांच्या नजरेस फ्लेक्स पडला आणि त्याचा कारणामा उघड झाला.
पुणे! वकील नवऱ्यासोबत अनैतिक संबंधाच्या संशय; धक्कादायक माहिती समोर…
पुणे शहरात घडली हादरवून टाकणारी घटना; गुन्हा दाखल…
पुणे जिल्ह्यात प्रेमासाठी चिमुकल्याची आईने केली अत्यंत क्रूरपणे हत्या…
पुणे शहरातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल; नोकरी गेली म्हणून…
पुणे पोलिसाच्या मोबाईलवर आली जाहिरात अन् बँकेतून पैसे गायब…

