
पुणे! प्रियकर पतीला मारत असताना पत्नीने मोबाईल सुरू केला अन्…
पुणे: भोसरी येथे एका विवाहितेने प्रियकराच्या मदतीने पतीला रबरी पाईप आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, प्रियकर पतीला मारत असताना पत्नीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमोल संग्राम ढवळे (वय २८, रा. केळवडे, ता. भोर) असे मारहाणीत जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. अमोल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. २८) दुपारी अडीचच्या सुमारास पत्नीने त्यांना भोसरीतील घरी बोलावून घेतले होते. तिथे पत्नी आणि तिचा प्रियकर अजय नात्रे (वय ३०, रा. सद्गुरुनगर, भोसरी) यांनी मिळून अमोलला दारू पाजली. त्यानंतर किरकोळ वादाचे निमित्त करून दोघांनी अमोलला मारहाण करण्यास सुरुवात केली.

प्रियकर अजय नात्रे हा अमोलला पाईपने बेदम मारत असताना, आरोपी पत्नीने पतीचा ओरडतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. या क्रूर मारहाणीत अमोलच्या मान, पाठीवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर जखमी अमोल यांनी मंगळवारी (३१ मार्च) भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. भोसरी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
पुणे! प्रियकराला संपवलं पण सिग्रेट अन् दारुच्या बाटलीने अडकवलं…
पुणे! पत्नी अन् प्रियकरानेच नकुल भोईर यांना संपवलं, प्रियकरला वाचविण्यासाठी…
पुणे! प्रेयसीने घरी एकटी असताना प्रियकराला घरी बोलावले अन्…
पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…
पुणे! पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; अनैतिक संबध…

