निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर गोळीबार…

अहिल्यानगर : जामखेड शहरातील कुख्यात गुंड सागर किसन मोहळकर (वय ३२, रा. जामवाडी, जामखेड) याच्यावर बुधवारी (ता. ५) रात्री गावठी कट्ट्यातून अज्ञातांनी गोळीबार केला आहे. नुरानी कॉलनी रस्त्यावर सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान हा हल्ला झाला. मोहळकर याच्यावर पाच ते सहा राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून त्याला चार गोळ्या लागल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सागर किसन मोहळकर हा गंभीर जखमी झाला असून, त्याला प्रथम जामखेडमधील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

मिळालेल्या माहितीनुसार, मोहळकर नुरानी कॉलनी परिसरात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्याच्यावर अचानक गोळीबार सुरू केला. हल्ल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. सलग झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांनी भीतीपोटी आसरा घेतला. गोळ्या लागल्यानंतर मोहळकर रस्त्यावर कोसळला. हल्लेखोरांनी घटनेनंतर तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली. जखमी मोहळकर याला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलविण्यात आले. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत त्याच्या शरीरात चार गोळ्या अडकल्या असल्याचे स्पष्ट झाले. एकूण पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरम्यान, मोहळकर याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तो काही काळ नाशिक कारागृहात होता आणि महिनाभरापूर्वीच जामिनावर सुटला होता. त्याच्या सुटकेनंतर शहरात तणावाचे वातावरण असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या गोळीबारामुळे गुन्हेगारी वर्तुळातील वाद पुन्हा चिघळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर नुरानी कॉलनी व परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी गस्त वाढवली असून पुढील तपास सुरू आहे.

Video! पोलिस अधिकारी अनिकेत पोटे यांची विशेष मुलाखत…

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…

निलेश घायवळ याची ‘8055 BOSS’ अशी नंबर प्लेट असलेली गाडी जप्त…

पुणे पोलिसांनी 9 अट्टल गुंडांना केलं तडीपार; पाहा नावे…

पुणे! वृद्धाला ‘व्हर्च्युअल कोर्टरूम’मध्ये डिजिटल अरेस्ट करणारे दोघे ताब्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!