
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; 10 जवानांचा मृत्यू…
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आज (गुरूवार) लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळले. या अपघातात 10 लष्करी जवानांचा मृत्यू झाला असून, इतर काही जवान गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकांनी एकत्रितपणे रेस्क्यू ऑपरेशन राबवून जखमी जवानांना बाहेर काढले.
लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, एक लष्करी वाहन 17 जवानांना घेऊन उंच भागातील एका चौकीकडे जात होते. यावेळी डोडा जिल्ह्यातील भद्रवाह-चंबा आंतरराज्य महामार्गावरील खानी टॉप परिसरात लष्कराचे बुलेटप्रूफ वाहन रस्त्यावरून घसरले आणि सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात 10 जवानांचा मृत्यू झाला असून उर्वरित जवान गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीने बचाव मोहीम सुरू केली. स्थानिक नागरिकही पोलिस आणि रेस्क्यू टीमच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. बचाव मोहिमेदरम्यान 10 जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमी जवानांनाही दरीतून बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या तिघा जवानांना हेलिकॉप्टरद्वारे उधमपूर येथील कमांड रुग्णालयात हलवण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत. अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जखमी जवानांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच या अपघातात प्राण गमावलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असल्याचेही लष्कराने स्पष्ट केले आहे.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
दरम्यान, यापूर्वी, 4 मे 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात लष्कराचे एक वाहन 600 मीटर खोल दरीत कोसळले होते. या अपघातात तीन सैनिकांचा मृत्यू झाला होता. लष्कराचे हे वाहन जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या ताफ्याचा भाग होते.
24 डिसेंबर रोजी पूंछ जिल्ह्यात लष्कराची व्हॅन 350 फूट खोल दरीत पडली. व्हॅनमध्ये 18 सैनिक होते, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला. अपघातात सहभागी सर्व सैनिक 11 व्या मराठा रेजिमेंटचे होते. लष्कराने सांगितले की, सहा वाहनांचा ताफा पूंछ जिल्ह्याजवळील ऑपरेशनल ट्रॅकवरून बनोई क्षेत्राकडे जात होता. एका वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटले, ज्यामुळे व्हॅन दरीत पडली.
सातारा! जवान विकास गावडे यांना पाणी पाजतानाचा क्षण काळजात चर्रर्र करून गेला…
सातारा सुन्न! एकीकडे पत्नी बाळाला जन्म देत होती अन् दुसरीकडे जवानाचा मृत्यू…
जवान चंदू चव्हाण! सीमापार छळ, लष्करी बडतर्फी, आंदोलन, कारावास आणि पुन्हा उभारीचा लढा…
महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण; वाहन कोसळले ८०० फूट खोल दरीत…

