
Cyber Crime! पुणे शहरातील नागिरकांना आमिष दाखवत 97 लाखांची फसवणूक…
पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, वर्क फ्रॉम होम तसेच पोलिसांकडून कारवाई होईल अशी भीती दाखवून चोरट्यांनी तब्बल 97 लाख 76 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
कात्रजमधील एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे सांगून जाळ्यात ओढले. त्यांनी काही रक्कम चोरट्यांच्या खात्यात जमा केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासवले, ज्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांनी आणखी रक्कम जमा केली. अशा प्रकारे एकूण 29 लाख 69 हजार रुपये जमा झाल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल नंबर बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
दुसऱ्या प्रकरणात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने आणखी दोन फसवणुकीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पुणे शहरातील काळेपडळ येथे एका युवकाची 33 लाख 12 हजार रुपयांची फसवणूक झाली असून, त्याने काळेपडळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तर बिबवेवाडी भागात एका युवकाला याच पद्धतीने 4 लाख रुपयांना गंडवले असून, त्यांनी बिबवेवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
महात्मा फुले पेठेतील एका युवकाला ‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी 11 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केली. ऑनलाइन काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे मेसेज पाठवून त्याला गंडवण्यात आले. त्याने खडक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तीला ‘मनी लॉन्ड्रिंगसाठी’ तुमच्या बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे आणि तुमच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई होईल, अशी भीती दाखवून सायबर चोरट्यांनी या ज्येष्ठाची 19.60 लाख रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, तपास करत आहेत.
Online फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; APK फाईलचा वापर…
व्हॉट्सअॅपवर RTO चालानचा मेसेज दिसला अन् लाखो रुपये गायब…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात तुमचं नाव आलंय; कोट्यावधींना गंडा…
नाशिकमध्ये Digital Arrest च्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक…
IPS विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून 78 लाख रुपयांना लुटलं…

