जालना हादरलं! वहिणी-दिराचे प्रेमसंबंध अन् जीव गेला नवऱ्याचा…

जालना : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या भावाचा भावानेच काटा काढल्याची धक्कादायक घटना बदनापूर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बदनापूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

ज्ञानेश्वर राम तायडे (वय 28) आणि मनिषा परमेश्वर तायडे (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सोमठाणा येथील मनिषा तायडे हिचे सख्ख्या लहान दीर ज्ञानेश्वर तायडे याच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. या संबंधांमध्ये पती परमेश्वर राम तायडे (वय 30) हा अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याची हत्या करण्याचे ठरवले. त्यानुसार, 15 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर आणि मनिषाने परमेश्वरच्या डोक्यात व चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली.

परमेश्वरचा मृतदेह एका मोठ्या गोणित भरला आणि सोमठाणा तलावात आणून फेकला. मात्र गावात परमेश्वर घरी नसल्याचे चर्चा सुरू झाली. पण, दीर आणि वहिणीच्या अनैतिक संबंधाची संपूर्ण गावभर चर्चा होती. त्यामुळे शंका आणि चर्चेला उधाण आले. याबाबतची माहिती बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना लागली. या प्रकरणाचा छडा लावला व 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास, बदनापूर हद्दीतील निकळज शिवारातील वाल्हा–सोमठाणा तलावात प्लास्टिकच्या मुरघासमध्ये गुंडाळलेले एक अज्ञात प्रेत आढळले. माहिती मिळताच बदनापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. ओळख पटविल्यावर तो मृतदेह परमेश्वर राम तायडे यांचा असल्याचे समोर आले. या प्रकरणी मयताचे वडील राम नाथा तायडे (वय 56) यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. परमेश्वर याचा घरातच घात झाल्याचे निष्पन्न झाले, पोलिसांनी कुठलाही वेळ वाया न घालवता तात्काळ मयत परमेश्वर तायडे याची पत्नी व सख्या भावाला ताब्यात घेतले. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. मनिषा आणि ज्ञानेश्वर यांच्यातील अनैतिक संबंधांना परमेश्वरचा विरोध होता. त्यामुळे संबंधात अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून परमेश्वरची हत्या केल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले. यामध्ये पोलिसांनी दोघांनाही तात्काळ अटक करून बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलिस करत आहे.

धक्कादायक! भावाला मारलं अन् गर्भवती वहिनीवर केला बलात्कार…

सोलापूरमधील दीर-वहिणी प्रेमसंबंध! जळलेल्या महिलेलं गुढ उलगडलं…

वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी…

वहिनी-वहिनी बोलायचा शेजारी अन् एक दिवस त्यानेच…

दीराने वहिनीच्या बहिणींना पाठवले नको ते मेसेज अन् पुढे तर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!