
पुणे! लग्नानंतर 45 दिवसांत झाला महागडा घटस्फोट; पोटगी पाहा…
पुणे : विवाहानंतर अवघ्या दीड महिन्यात घटस्फोट झाला आहे. पसंत नसल्याचे आणि हुंडा-मानपान केला नसल्याचं कारण देऊन नववधूला घराबाहेर काढणाऱ्या पतीसह-सासरच्या मंडळींनी एकरकमी 45 लाख रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शवली. त्यानंतर नववधूने सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे दावे मागे घेतले असल्याची घटना समोर आली आहे. महागड्या घटस्फोटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
वर्षभरापासून न्यायालयीन लढाई लढणाऱ्या एका दाम्पत्याचा परस्पर संमतीने घटस्फोट अर्ज न्यायालयाने मंजूर केला. पत्नीच्या वकिलांनी केलेल्या समुपदेशनातून या कौटुंबिक वादात तडजोडीचा मार्ग निघाला आहे. या दाम्पत्याचा विवाह जानेवारी २०२२ मध्ये मोठ्या थाटामाटात झाला होता. नवरी सासरी गेल्यानंतर काही दिवसांतच घरात वादाचे वातावरण सुरू झाले. लग्नात हुंडा व मानपान झाले नाही. “मला तू पसंत नाहीस; घरच्यांच्या दबावाखाली मी हे लग्न केले,” असे बोलत पत्नीला सतत टोमणे मारले जात होते.
पती-पत्नीतील भांडणे चिघळल्यानंतर नवरीला सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढले, असा आरोप करून तिने पती, सासू, सासरा व नणंदेविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी करून संबंधितांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला व न्यायालयात आरोपपत्र सादर केले. दोन्ही पक्षांचे समुपदेशन केल्यानंतर पतीने ४५ लाख रुपये एकरकमी पोटगी देण्यास सहमती दर्शवली. पत्नीनेही सकारात्मक प्रतिसाद देत कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप मागे घेतला. त्यानंतर आरोपींना न्यायालयाने कायदेशीररीत्या मुक्तता दिली. वाद मिटल्यानंतर दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने घटस्फोटाला मंजुरी दिली. वर्षभर चाललेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, दिवसाला एक लाख रुपयांप्रमाणे हा महागड्या घटस्फोट असल्याची चर्चा आहे.
सायना नेहवाल अन् पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट; फुलराणी म्हणाली…
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनचं उत्तर; मी पुन्हा लग्न करतोय…
Video : महिलेला घटस्फोटाचा मोठा आनंद; कपडे फाडले, केक कापला…
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घेतला घटस्फोटाचा निर्णय…
पहिल्या घटस्फोटातून सावरून केला दुसरा विवाह तर महिलेने…

