अवैध सागवान तोड प्रकरणी ६ संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल…

घाटंजी (यवतमाळ) : सावळी (सदोबा) वनविभागातील बेलोरा वर्तुळ क्षेत्रातील जंगलात सुरू असलेल्या अवैध सागवान वृक्षतोडीवर सावळी (सदोबा) वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 4.5 घनमीटर सागवान लाकडे जप्त करण्यात आली असून त्याची किंमत अंदाजे एक लाख रुपये आहे, असे समजते.

या प्रकरणात सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात संदिप पवार, दिलीप सिडाम, ज्ञानेश्वर जाधव, प्रमोद जाधव, संतोष जाधव आणि दयाराम जाधव (सर्व रा. सुभाष नगर ता. आर्णी) या संशयित आरोपींचा समावेश आहे.

सर्व आरोपीं विरुद्ध वनकायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांना घाटंजी येथील दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी प्रविण पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता, घाटंजी येथील न्यायालयाने संशयित आरोपींचा जामीन मंजूर केला आहे.

सदरची कारवाई सहाय्यक वनसंरक्षक दादासाहेब तौर यांच्या मार्गदर्शनाखाली सावळी (सदोबा) येथील वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रशेखर भोजने यांनी केली आहे. सदर प्रकरणाचा तपास सावळी (सदोबा) वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयांअंतर्गत सुरू आहे. या मुळे आर्णी तालुक्यातील सागवान चोरट्यात दहशत पसरली आहे.

पुणे पोलिस दलात होणार मोठी भरती…

आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी गोठवली २७ बँक खाती ; बॅंकेत रक्कम किती पाहा…

आईवर बलात्कार करणा-या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा…

नगरमध्ये 4 सख्ख्या बहि‍णींवर नातलगाने केला लैंगिक अत्याचार…

सांगली! ‘स्पेशल 26’ फिल्मी स्टाईलने दरोडा टाकणाऱ्या टोळीचा लावला छडा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!