
एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या करणारा आरोपी 10 महिन्यानंतर टॅटूमुळे गजाआड…
ठाणे : एकतर्फी प्रेमातून युवतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहरात घडली होती. याप्रकरणी, तब्बल 10 महिन्यांनंतर आरोपी राजू महेंद्र सिंह (वय 24) याला पोलिसांनी अटक केली असून हातावरील टॅटूमुळे या हत्याकांडाचे गूढ उलगडले आहे. राजूने नितूच्या खुनाची कबुली दिली असून त्याला आश्रय व मदत करणाऱ्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
नितू भानसिंग (वय 23) या युवतीवर आरोपी दोन वर्षांपासून एकतर्फी प्रेम करत होता. त्याने नितूला अनेकदा लग्नाची मागणी घातली होती. मात्र, नितूने त्याला नकार दिला होता. नितूने त्याच्याशी बोलणंही बंद केले होते. या गोष्टीचा राग मनात धरून 28 ऑक्टोबरच्या रात्री सव्वा अकराच्या सुमारास राजूने नितूच्या घरात घुसून धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार करत तिची हत्या केली. नितूवर हल्ला होत असताना तिची लहान बहीण ऋतु घरी आली. तिने बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या आरोपीने तिच्यावरही वार केले. या घटनेनंतर नितूला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, नीतूचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी राजू घटनास्थळावरून फरार झाला होता. शिवाय, पोलिसांना तब्बल दहा महिने तो चकवा देत होता.
जखमी झालेल्या ऋतूने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपीच्या हातावर टॅटू असल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राजू इंदोरमध्ये ‘सुरज’ या नावाने राहत असून नोकरी शोधत आहे. शांतीनगर पोलिसांनी इंदोर क्राईम ब्रांचच्या मदतीने सापळा रचला. राजूने स्वतःला सुरज असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हातावरील टॅटूने त्याची खरी ओळख उघडकीस आली. हत्या केल्यानंतर राजूने भिवंडी सोडून उत्तर प्रदेश, प्रयागराज, इंदूर अशा विविध भागांत आपलं नाव बदलून वास्तव्य केले होते. तो मोबाईल बंद ठेवायचा, नाव बदलून परिसरात हिंडायचा आणि सतत ठिकाणं बदलत राहायचा. यामुळे शांतीनगर पोलिसांना त्याला पकडणं अवघड जात होते. अखेर, टॅटूमुळे ओळख पटल्यावर पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे.
पोलिस चौकशीत राजूने नितूच्या खुनाची कबुली दिली. त्याला आश्रय व मदत करणाऱ्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तब्बल 10 महिन्यांनंतर आरोपी गजाआड झाल्याने पीडित कुटुंबाला अर्धा न्याय मिळाला आहे. एकतर्फी प्रेमातून निर्घुण हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
उपसरपंच अंखड बुडाला होता नर्तिकेच्या प्रेमात; कसा झाला शेवट पाहा…
प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…
एकतर्फी प्रेम! मैत्रिणीने भेटण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर बोलावलं अन्…
धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…
एकतर्फी प्रेम! बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची धमक्यांना कंटाळून आत्महत्या…

