
पुणे! गौतमची पाच दिवस मृत्यूशी झुंज; कुत्र्यावर दया अन् केसं-दाढी…
पुणे: सिंहगड फिरायला गेलेल्या आणि गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या हैदराबादच्या गौतम गायकवाड (वय २४) याची कहाणी अखेर समोर आली आहे. कुत्र्यावर दया आली अन् घात झाला होता. सिंहगडावर फिरताना काढलेल्या फोटोमध्ये गौतमच्या डोक्यावर केसं दिसत होती. मात्र, सापडल्यानंतर काढलेल्या फोटोमध्ये त्याच्या डोक्यावरची केसं आणि दाढी काढलेली दिसत आहे. त्यावर गौतमने खुलासा केला आहे.
पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!
सिंहगडावर मित्रांसह फिरायला गेलेला गौतम अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. सिंहगडावरील तानाजी कड्याजवळ त्याची चप्पल सापडल्यामुळे तो दरीत पडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. अखेर पाच दिवसांच्या शोधमोहिमेनंतर तो दरीत जखमी अवस्थेत आढळला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाच दिवसांनी तो जिवंत बाहेर आल्याने त्याच्या मित्र आणि कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
गौतमने सुरुवातीला कर्जामुळे बेपत्ता होण्याचा बनाव रचला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. पण, खुद्द गौतमनेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या घटनेमागचे सत्य सांगितले आहे. गौतम म्हणाला, “मी मित्रांसोबत सिंहगडावर फिरायला गेलो होतो. लघुशंका करण्यासाठी मी बाजूला गेलो. त्यावेळी तानाजी कड्याजवळ मला एक कुत्रा अडकलेला दिसला. त्याला वाचवण्यासाठी मी खाली उतरलो, पण त्याचवेळी माझा पाय घसरला आणि मी दरीत पडलो. दरीचा कडा असल्याने मला वरती चढता आले नाही. मदतीसाठी खूप ओरडलो, पण सतत पाऊस असल्याने माझा आवाज कुणी ऐकू शकले नाही. दरीत एका ठिकाणी थांबलो आणि तिथेच झोप लागली. जाग आल्यावर काहीच दिसत नव्हते. हळूहळू पुढे सरकत होतो. जवळपास पाच दिवस अन्न किंवा पाणी काहीच मिळाले नाही. पाच दिवसांनी काही माणसे दिसल्यानंतर त्यांच्या दिशेने चालत गेला आणि दोन लोक त्याला भेटले. त्यांच्या मदतीने तो दरीतून बाहेर आलो.’
केसं आणि दाढी कुणी काढली…
सिंहगडावर फिरताना काढलेल्या फोटोमध्ये गौतमच्या डोक्यावर केसं दिसत होती. मात्र, सापडल्यानंतर काढलेल्या फोटोमध्ये त्याच्या डोक्यावरची केसं आणि दाढी काढलेली दिसत आहे. त्यावर गौतमने खुलासा केला आहे. रात्रीच्या वेळी रातकिड्यांनी मला हैराण केलं होते. किडं माझ्या केसात, दाढीत अन् अंगात शिरल्यामुळे सतत खाज येत होती. माझ्या खिशात मी बॉक्स ओपन करण्यासाठी बारके ब्लेड आणि सिझर ठेवतो. माझ्या पर्समध्ये ते कायम असते. मी कैचीनं हातात जशी केस येतील ती कापली. माझ्या तोंडावर सगळं पावसाचं पाणी पडत होतं. मी ब्लेडने दाढी काढली, त्यात लय किडं जात होती. माझ्याकडे मोबाईल नव्हता. माझा मोबाईल मोठा असल्यामुळे तो मित्राच्या खिशात ठेवायला दिला होता. पाच दिवस मला काहीच खायला मिळाले नाही. जसं जसं पुढे जायला मिळत होतं तसं मी पुढं जात होतो. पाच दिवसांनी मला समोर लांब काही माणसं दिसली, पण माझा आवाज त्यांना जात नव्हता. मला कोणतीच आशा शिल्लक राहिली नाही. मित्रांनी मला शोधण्याचा प्रयत्न केला पण मला आवाजच आला नाही.’
पुणे! सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाड प्रकरणाला वेगळं वळणं…
पुणे ! प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा कात्रज घाटात केला खून…
एक प्रियकर अन् दोन मैत्रिणी! महिला होमगार्डच्या खूनाचा उलगडा…
पुणे! नवऱ्याच्या प्रेयसीला पार्सल द्यायचे असल्याचे सांगितले अन्…
पुणे! प्रांजल खेवलकरांनी अनेकदा मुलींना बोलावले; रोहिणी खडसे म्हणाल्या…
पुणे! लग्नाची बोलणी सुरू असताना फिरायला गेले अन् ठेवले शरीरसंबंध…
पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…

