
गडचिरोली! पहाटे फिरायला गेलेल्या 6 मुलांना भरधाव ट्रकनं चिरडलं; पाहा नावे…
गडचिरोली: गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काटली येथे भरधाव ट्रकने 6 मुलांना चिरडले असून, या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दोघांना नागपुरच्या रूग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. सहाही मुलं रस्त्यावर व्यायाम करत असताना अज्ञात ट्रकची जोरदार धडक बसली. दोन मुलांचा जागीच मृत्यू तर दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे.
सहाही मुलं रस्त्यावर व्यायाम करत होती, त्याचवेळी वेगात आलेल्या ट्रकची जोरदार धडक बसल्याने दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. आणखी दोघांना नागपुरच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे.
टिंकू नामदेव भोयर (१४), तन्मय बालाजी मानकर (१६), दुषण दुर्योधन मेश्राम (१४), तुषार राजेंद्र मारभते (१४) सर्व राहणार काटली अशी मृतांची नावे आहे. धडक दिल्यानंतर अंधाराचा फायदा घेत ट्रक चालक पसार झाला असून, पोलिस शोध घेत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सहाही मुले नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला गेले होते. गडचिरोली-आरमोरी मार्गांवरील काटली गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या नाल्याजवळील मार्गावर ही मुले बसली होती. दरम्यान ५ वाजून १० मिनिटाच्या सुमारास एका भरधाव अवजड वाहनाने सहाही मुलांना उडविले. यात टिंकू आणि तन्मय या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान दुषणची प्राणज्योत मालवली. अपघातात जखमी क्षितिज तुळशीदास मेश्राम, आदित्य धनंजय कोहपरे या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. दोघांची प्रकृती नाजूक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अपघातानंतर घटनास्थळावर काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, भरधाव अवजड वाहतुकीवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्राथमिक तपास सुरु केला आहे. प्रकाश कमी असल्याने आसपासच्या लोकांना ट्रक क्रमांक नोंदविता आला नाही. अपघाताची माहिती मिळताच गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी जात प्रत्यक्षदर्शींचे जबाब देखील घेतले आहे. त्यामुळे लवकरच धडक देणाऱ्या वाहनाची ओळख पटविण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान, संतप्त गावकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामचा प्रयत्न सुरू आहे. गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.
वाहनांची तपासणी करत असताना स्कॉर्पिओने महिला कॉन्स्टेबलला चिरडले…
Video: पुणे शहरात ट्रकने महिलेला चिरडले; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद…
हृदयद्रावक! बहिणीच्या डोळ्यादेखत लहान भावाला ट्रकने चिरडलं…
Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू…
भीषण अपघात! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन युवकांना एसटी बसने चिरडले…
हृदयद्रावक! पुणे-नगर महामार्गावरील वाघोली येथे डंपरने ९ जणांना चिरडलं; पाहा नावे…

