
पुणे! म्हातारा रिसेप्शनिस्ट युवतीला म्हणाला; मला एक पप्पी दे, तुला जे हवं ते देतो…
पुणे: पुणे शहरात 73 वर्षीय वृद्धाकडून क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट युवतीकडे मला एक पप्पी दे, तुला जे हवं ते देतो, असे म्हणत विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
73 वर्षीय वृद्धाने एकट्या असलेल्या युवतीसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप युवतीने (वय २७) केला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 3 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे. क्लिनिकमध्ये सुरेशचंद चोरडिया (वय ७३) नावाचा वृद्ध रुग्ण म्हणून आला होता, क्लिनिकमध्ये त्या दिवशी रिसेप्शनवर एकटीच युवती उपस्थित होती. ही संधी साधत आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन सुरू केले. त्याने अचानक रिसेप्शनिस्टच्या गालाला हात लावत “पप्पी दे” अशी मागणी केली. यानंतर खिशाकडे हात दाखवत म्हणाला, “माझ्याकडे पैसे आहेत, तुला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो, तुला जे हवे ते मी देतो, पण तू मला पाहिजे ते कर. या प्रकारामुळे घाबरलेल्या युवतीने तात्काळ क्लिनिक सोडलं आणि बाहेर पळ काढला. मात्र वृद्धाने तिला पाठलाग करत, “उद्या क्लिनिकमध्ये आहेस का?” असा प्रश्न विचारत तिला त्रास दिला.
पीडित युवतीने धाडसाने याबाबत तक्रार दिली असून, या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपी वृद्धावर संबंधित कलमांखाली कारवाई होणार आहे.
पुणे जिल्ह्यात वारकऱ्यांना लुटून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे दोघे ताब्यात…
पुणे शहरात धक्कादायक प्रकार उघड; पैशासाठी 40 दिवसांच्या लेकराला विकलं…
पुणे! कोंढवा प्रकरणातील युवक-युवतीची समोरासमोर बसून केली चौकशी…
प्रेम प्रकरण! फोन सायलेंट मोडवर अन् प्रेयसीचा झाला मोठा गैरसमज…
पुणे शहरात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या भाजप नेत्यावर कारवाई; पाहा गुन्हे…

