
पुणे शहरात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या भाजप नेत्यावर कारवाई; पाहा गुन्हे…
पुणे : भाजपचा पुण्यातील नेता प्रमोद कोंढरे याने महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याच्यावर या अगोदरही डेक्कन पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, खडक पोलिस स्टेशन आणि डेक्कन पोलिस स्टेशनमध्येही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
शनिवार वाड्याजवळ एका कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेऊन प्रमोद कोंढरे याने महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग केला. या महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर प्रमोद कोंढरे याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे नेते शनिवार वाड्याजवळ जमले होते. त्यानंतर भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना एका दुकानात चहा पिण्यासाठी घेऊन गेले. त्यावेळी प्रमोद कोंढरे याने गर्दीचा फायदा घेऊन महिला पोलिस निरीक्षकाला दोन वेळा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केला. त्यानंतर त्या महिला पोलिस अधिकाऱ्याने ही गोष्ट वरिष्ठांना सांगितली.
पोलिसांकडून त्या चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज काढून तपासण्यात आले. त्यामधून महिला पोलिस निरीक्षकाच्या आरोपांना पुष्ठी मिळाली. त्या महिला पोलिस निरीक्षकाने याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिली. त्यानंतर प्रमोद कोंढरे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद कोंढरे याने एक पत्रक काढून त्यांच्यावरील आरोप फेटाळले असून गैरसमजातून हा प्रकार घडल्याचा दावा केला आहे.
प्रमोद विठ्ठल कोंढरे याच्यावर दाखल असलेले गुन्हे पुढीलप्रमाणे…
1) खडक पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 285/2015 IPC 385,506,507
2) विश्रामबाग पोलीस स्टेशन 336/2010 IPC 452, 143, 147, 149, 427, 506
3) विश्रामबाग पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 3140/2011 IPC 188, 34
4) डेक्कन पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 57/2022 IPC 354, 504, 506, 43
महिला पोलिस हात जोडत म्हणाल्या, मी आईच्या भावनेने रागावले…
पोलिस पत्नीची वर्दी घालून अनेकांना गंडवले; पाहा कारनामे…
पुणे! महिला पोलिस अधिकाऱ्याचा भाजपच्या नेत्याने केला विनयभंग…
पुणे जिल्हा! तलाठ्याची युवतीसह आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले, पत्नीचे अनैतिक संबंध…
पुणे जिल्ह्यात शिक्षकाने शाळेत केला अल्वपयीन मुलीचा विनयभंग; पाहा कारनामे…
पुणे शहरात महिलेने चिमुकल्यासह टेरेसवरून मारली उडी; चिठ्ठीत लिहिले…
पुणे! प्रेयसीने घरी एकटी असताना प्रियकराला घरी बोलावले अन्…
पुणे जिल्हा हादरला! पत्नीला तीन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास पाडले भाग…

