
महापालिका उपायुक्त लाखो रुपयांची लाच घेताना जाळ्यात…
सांगली : लाच मागितल्या प्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्तच लाच-लुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. तब्बल 7 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडाडीची मोहीम हाती घेतली असून लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना दणका दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यास 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. आता, सांगली महापालिकेचे उपायुक्तच लाच-लुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत.
महापालिका क्षेत्रातल्या एका 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी उपायुक्त साबळे यांनी 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 10 लाखांची मागणी करून 7 लाख रुपयांच्या रक्कमेवर तडजोड झाली होती. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीला माहिती दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित तक्रारदाराच्या सांगण्यावरुन सापळ रचला. त्यानुसार, तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे उपायुक्तांनी 7 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरुन, एसीबीने उपायुक्त वैभव साबळे विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, महापालिका उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरील कारवाईनंतर महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी, एसीबी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना पकडले रंगेहात…
साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकातील लाच घेणारे पाच अधिकारी निलंबीत…
लाच घेतल्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा व 12 हजार द्रव दंड…
शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरात मिळालं घबाड…
Video: ‘एसीपी’साठी लाखाची लाच घेणारा अडकला ‘एसीबी’च्या जाळ्यात…

