Video: उपसंचालकाने दाताने जोरात चावा घेत अभियंत्याचे तोडले नाक….

लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूरमध्ये उपसंचालकाने निवृत्त अभियंत्याशी वाद घालत दाताने चावा घेत अभियंत्याच्या नाकाचा शेंडा तोडल्याची घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

उपसंचालकानं दाताने चावा घेत अभियंत्याचा नाकाचा शेंडा कापला. एवढ्या जोरात चावा घेतला की नाकाचा तुकडा बाजूला पडला. नाकातील रक्तस्त्राव पाहून अभियंत्याच्या मुलाने त्यांना रुग्णालयात नेले. मुलाने सांगितले की, त्याने त्याच्या वडिलांवर उपचार करून घरी आणले आहे. ते बोलू शकत नाहीत. एक-दोन दिवसांत दिल्लीला नेले जाईल. जिथे नाकाची प्लास्टिक सर्जरी केली जाईल.

निवृत्त कापड अभियंता रूपेश सिंह (वय ६४) यांचा मुलगा प्रशांत सिंह म्हणाला की, मी माझ्या वडिलांसोबत रतन प्लॅनेटच्या ए-ब्लॉकमधील फ्लॅट क्रमांक 202 ​​मध्ये राहतो. निर्यात तपासणी एजन्सी (ईआयए) मध्ये उपसंचालक असलेले क्षितिज मिश्रा (वय ५५) त्याच सोसायटीच्या डी-ब्लॉकमधील फ्लॅट क्रमांक 1505 मध्ये राहतात. रविवारी संध्याकाळी, म्हणजे 25 मे रोजी, क्षितिजला दिलेल्या पार्किंगमध्ये कोणीतरी त्यांची कार उभी केली. घटनास्थळी वडील पोहोचताच क्षितिजने त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. तो म्हणाला की, सोसायटीत दररोज नाटक सुरू असते, ज्याला हवे असेल तिथे गाडी पार्क करा. जेव्हा पप्पांनी या गैरवर्तनाला विरोध केला तेव्हा क्षितिजने त्याच्या चार मित्रांसह पप्पांना मारहाण केली. यानंतर क्षितिजने पप्पांना मिठी मारली आणि दातांनी त्यांचे नाक चावले. पप्पांच्या नाकातून रक्त येऊ लागले आणि तो ओरडू लागले. ओरड ऐकून सोसायटीतील इतर लोक घटनास्थळी पोहोचले. मीही तिथे पोहोचलो आणि पप्पांना उपचारासाठी रिजन्सी रुग्णालयात दाखल केले. क्षितिज माझ्या पप्पांना मारू इच्छित होता. त्याने त्यांना यापूर्वीही धमकी दिली आहे. आता आम्ही पप्पांना प्लास्टिक सर्जरीसाठी दिल्लीला घेऊन जाणार आहोत.

एसीपी विनेश त्रिपाठी म्हणाले की, ‘रतन प्लॅनेट स्क्वेअरमधील पार्किंग वादात एका व्यक्तीचे नाक कापल्याचा गुन्हा समोर आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीवर उपचार सुरू असून, पुढील तपास करत आहोत.’

Video: महाराष्ट्राचे सुपुत्र IPS विनायक भोसले यांची दंबंग कामगिरी…

हृदयद्रावक! कुटुंबातील सात जणांनी घेतला एकाच वेळी जगाचा निरोप; कारण…

अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…

‘लुटेरी दुल्हन’ अखेर सापडली! तब्बल २५ लग्न, दिवसातून ३ वेळा अंघोळ अन्…

पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योतीनंतर आता प्रियांका आली समोर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!