पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…

पुणे : पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय सध्या फरार असून वैष्णवीच्या वडिलांकडून आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे. राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.

हुंडा आणि पैशांची मागणी करत हगवणे कुटुंबीयांकडून वैष्णवीचा जाच करण्यात आल्यानेच तिने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोपी वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शुभम हगवणे फरार आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

वैष्णवीचा तिच्या मैत्रिणीसोबत संवाद झाला असून, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपवरून आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. वैष्णवीने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास तिच्याशी बोलून दाखवला. विशेष म्हणजे वैष्णवी हिचा लग्न प्रेमविवाह होता, पण हीच माझी सर्वात मोठी चूक असल्याचे तिने म्हटलं आहे.

पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर…
www.puneganpati.com

तू फालतू, घणेरडी…
लग्न करून मी चूक केली, असं वैष्णवी म्हणताना दिसत आहे. “मला ताई म्हणाली मी तुझी सगळीकडे बदनामी करते. जे केलंय, जे केलं नाही ते सगळं सांगते. मला म्हणाली की तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते. शशांकसोबतही तू कधी लॉयल नव्हती, असं मला ताई म्हणाली. तू फालतू तू घणेरडी आहे, असं म्हणत होती. पप्पा आणि मम्मी यांनाही ती काही काही म्हणत म्हणत होती,” असे या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येत आहे.

घटस्फोट देणार…
तसेच, मला मारताना दाजी बघत होते. त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला. विशेष म्हणजे दाजींनाही ते खरं वाटलं आहे. त्यामुळे मी त्या माणसाला घटस्फोट देणार आहे. मी पप्पांना हे सांगितलं आहे. आपण त्यावर विचार करू, असं मला पप्पांनी सांगितलं आहे, असेही वैष्णवीच्या या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत.

माझी चूक झाली…
मला खूप आश्चर्य वाटत आहे. माझा नवराच माझा कधी झाला नाही. सासू-सासरे यांच तर तसंच वागणं असतं. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं. इथंच माझी चूक झाली. मी त्या घरात जाऊन चूक केली. सगळं बोलण्याच्या, समजण्याच्या पलीकडे गेलं आहे. ही छोटी गोष्ट आहे, असेही या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

पिंपरी येथील वैष्णवी हगवणे नावाच्या विवाहितेचा मृत्यू झाला आहे. 16 मे 2025 रोजी तिने तिच्या आत्महत्या केल्याचे सांगितलं जात आहे. मात्र तिने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पती, सासू-सासरे तसेच नंदेकडून तिचा जाच केला जायचा, असा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वैष्णवी आणि तिचा नवरा शशांक यांचा प्रेमविवाह होता. घरच्यांच्या विरुद्ध जाऊन वैष्णवीने हे लग्न केले होते. परंतु तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत होता. लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून तब्बल 51 तोळे सोनं दिलं होतं. तसेच फॉर्च्यूनर गाडीही दिली होती. यासह महागडी भांडी, लग्नानंतर चांदीची मूर्ती, दीड लाखांचा मोबाईल असं बरंच काही वैष्णवीच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना दिले होते. तरीदेखील तिचा जाच केला जात होता, असा आरोप करण्यात आला आहे.

(ऑडिओ क्लिपची पोलिसकाका पुष्टी करत नाही.)

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…

पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…

पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…

पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…

पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!