पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पती जेलमध्ये तर पत्नीला प्रियकरासोबत हॉटेलमध्ये पकडले रंगेहाथ…

बंगळूरू (कर्नाटक): पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पतीची कारागृहात रवानगी झाली. पण, दुसरीकडे मृत समजलेली पत्नी प्रियकरासोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ सापडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पाच वर्षांपूर्वी 2020 मध्ये पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली नवऱ्याला तुरुंगात पाठवले गेले होते, ती महिला आता जिवंत सापडली आहे. ही महिला 1 एप्रिल रोजी एका हॉटेलमध्ये दिसली. मृत झालेली महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत डिनर करत होती. या घटनेमुळे पोलिसांच्या तपासातील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. ही बाब अतिशय गंभीर मानून न्यायालयाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना (एसपी) समन्स बजावले असून 17 एप्रिलपर्यंत संपूर्ण अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यातील कुशलनगरजवळील एका गावात राहणाऱ्या सुरेशने 18 वर्षांपूर्वी मल्लिगे नावाच्या महिलेशी लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुले आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये त्याची पत्नी मल्लिगे अचानक बेपत्ता झाली. सुरेशने कुशलनगर ग्रामीण पोलिस ठाण्यात पत्नी मल्लिगे हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही वेळातच बेट्टादरापुरा (पेरियापट्टणा तालुका) परिसरात एका महिलेचा सांगाडा सापडला. हा मल्लिगेचा सांगाडा असल्याचा विश्वास ठेऊन पोलिसांनी सुरेशला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल केले.

सुरेशचे वकील पांडू पुजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी डीएनए अहवाल येण्यापूर्वीच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले, तर मल्लिगेच्या आईच्या रक्ताचे नमुने सांगाड्याच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले. नंतर जेव्हा डीएनए रिपोर्ट आला तेव्हा त्यात काही जुळत नव्हते, म्हणजे सांगाडा मल्लिगेचा नव्हता. तरीही, न्यायालयाने सुरेशची मुक्तता याचिका फेटाळून लावत साक्षीदार तपासण्यास सुरुवात केली.

सुरेशच्या वतीने ग्रामस्थ व मल्लिगेच्या आईने न्यायालयात साक्ष दिली की मल्लिगे जिवंत असून ती कोणासोबत तरी पळून गेला आहे. असे असतानाही, पोलिसांनी मल्लिगेचा खून झाला असून सांगाडा तिचाच होता या अहवालावर ठाम राहिले. 1 एप्रिल 2025 रोजी, सुरेश काच्या मित्राने मलिगेला मडिकेरी येथील एका हॉटेलमध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहिले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि मल्लिगेला मडिकेरी पोलिस ठाण्यात आणले. यानंतर पाचव्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टात चौकशीदरम्यान मल्लिगेने कबूल केले की तिने तिचा प्रियकर गणेशसोबत पळून जाऊन त्याच्याशी लग्न केले होते. तिने असेही सांगितले की ती मडिकेरीपासून अवघ्या 25-30 किमी अंतरावर असलेल्या शेट्टीहल्ली गावात राहत होती, परंतु पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही.

न्यायालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेत कुशलनगर आणि बेत्तादरपुरा पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आणि महिला जिवंत असताना पोलिसांनी आरोपपत्र कशाच्या आधारे दाखल केले असे विचारताच पोलिसांकडे कोणतेही स्पष्ट उत्तर नव्हते. न्यायालयाने आता जिल्हा पोलीस अधीक्षकांना (एसपी) समन्स बजावले असून 17 एप्रिलपर्यंत संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Video: Ex IPS रविंद्रनाथ पाटील यांनी येरवडा कारागृहातील दिली धक्कादायक माहिती…

प्रियकराने कारागृहात जाण्यापूर्वीच प्रेयसीसोबत उचललं टोकाचं पाऊल…

खळबळजनक! कारागृहात शरीर संबंध ठेवतानाच व्हिडिओ व्हायरल…

महिला कैदी बनली रेडीओ जॉकी! कारागृहात होणार महिला कैद्यांचे मनोरंजन…

कारागृहातील नवऱ्याच्या कैदी मित्राच्या प्रेमात पडली पत्नी अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!