मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीने एकाच दोरीने घेतला गळफास; चिठ्ठीत लिहीले की…

धाराशिव: मुख्याध्यापकाची पत्नी आणि वर्षभरापूर्वी विवाह लावून दिलेल्या लेकीने एकाच दोरीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना तुळजापूरमध्ये घडली आहे. रत्नमाला पवार आणि प्रतीक्षा पाटील (वय 23) असे आत्महत्या केलेल्या माय-लेकींची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. वर्षभरापूर्वी शेतकरी मुलाशी लग्न लावून मुलगी नैराश्यात होती. मुलगी प्रतीक्षाला शिक्षण घ्यायचे होते. मात्र, शिक्षण बंद करून विवाह करण्यात आल्याचे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये समोर आले आहे. शेतकरी मुलासोबत विवाह लावून दिल्यानंतर मुलगी नाराज होती असे चिठ्ठीत म्हटले आहे.

तुळजापूरमध्ये एका शाळेत मुख्याध्यापक असलेले संजय पवार मंगळवारी शाळेत गेल्यानंतर पत्नी रत्नमाला पवार आणि विवाहित मुलगी प्रतीक्षा पाटील यांनी एकाच दोरीने गळफास घेतला. प्रतीक्षा पाटील हिचा सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी तालुक्यातील सापटणेमध्ये शेतकरी तरुणाशी वर्षापूर्वी विवाह झाला होता. आत्महत्या करण्यापूर्वी रत्नमाला पवार आणि प्रतीक्षा पाटील यांनी आपल्या घराचा दरवाजा बंद न करता फक्त पुढे ढकलला होता. गेटला कुलूप लावत शेजाऱ्यांना चावी दिली होती. त्यांना बाहेर जात असल्याचे सांगितले, पण दुसऱ्या दरवाजाने घरात येऊन दोघींनी गळ्याला दोरी लावली. संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! मानसी लोहगडावरील एका कठड्यावर निराश अवस्थेत बसली अन्…

बीड! शिक्षकानं हृदयद्रावक पोस्ट लिहून संपवलं आयुष्य; मुंडेंनी खूप छळ केला…

हृदयद्रावक! धुळवडीच्या दिवशी दोन मावस भावांचा धरणात बुडून मृत्यू…

हृदयद्रावक! बहिणीच्या डोळ्यादेखत लहान भावाला ट्रकने चिरडलं…

हृदयद्रावक! मुलांची हत्या केल्यानंतर आई-वडिलांनी घेतला गळफास…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!