
पुणे जिल्ह्यातील पोलिसाचा धक्कादायक Video Viral…
पुणे: पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील एका पोलिस कर्मचाऱ्याने वर्दीचा धाक दाखवत मेसचे डब्बे पोहोचवणाऱ्या महिलेकडं शरीरसुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी पोलिस हा दारुच्या नशेत एका हॉटेलवर गेला होता. मेसचे डब्बे पोहोच करणाऱ्या महिलेसोबत जवळीक साधत त्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे.
महिलेनं विरोध करताच आरोपी पोलिसाने आपला पवित्रा बदलला. आपण हॉटेलमध्ये छापा टाकायला आल्याचा बनाव त्याने केला. यावेळी संबंधित पोलिसाच्या पायात बूट आणइ अंगावर वर्दी नव्हती. त्याने जॅकेटच्या आतमध्ये वर्दी लपवली होती. यावरून पीडित महिलेने पोलिसाला जाब विचारला, तुम्ही छापा टाकायला आला आहात तर तुमचं पोलिस पथक कुठे आहे? असा सवाल विचारला. दारुच्या नशेत तुम्ही कशी छापेमारी करू शकता? असा सवालही महिलेने विचारला. यावर आरोपी पोलिसाला काहीच उत्तर देता आले नाही.
उरळीकांचन पोलीस स्टेशनचा पोलिस नाव श्री गणैश रतन दाभाडे पो. हवालदार बिल्ला क्र. ३२१ पुणे ग्रामीण मेसचे डबे पोचवणाऱ्या महिलेकडे वर्दीचा धाक दाखवून शरीर सुखाची मागणी करत होता..! महिलेने विरोध करताच पवित्रा बदलला. संबंधित पोलीस स्टेशन महिलेची तक्रारही लिहून घेत नाही.@Dev_Fadnavis pic.twitter.com/xrJgs89FTM
— SushmaTai Andhare (@andharesushama) March 22, 2025
पीडित महिलेने संबंधित प्रकार स्वत: आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. याबाबतचा व्हिडीओ आता समोर आला असून, सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संबंधित व्हिडीओ एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग करत, आरोपी पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
पुणे! IT इंजिनियरचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् चिमुकल्याचा चिरला गळा…
पुणे! हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणात नवा ट्वीस्ट…
पुणे! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्रांनी केला मोठा घात; धक्कादायक माहिती समोर…
पुणे! विद्येच्या माहेरघरात युवतीवर केला बलात्कार…
पुणे पोलिसांनी गौरव अहुजा याच्यासह मित्राचा उतरवला माज; लघवी केली तिथेच…

