पुणे शहरातून गुन्हेगार तडीपार; आढळल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन…

पुणे (संदिप कद्रे): चंदननगर पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रथमेश ऊर्फ मोन्या सुनील गायकवाड (वय २० वर्षे, रा. इंदिरानगर, लेन नं.३, निरामय हॉस्पीटल जवळ, वडगावशेरी पुणे. मुळ रा. करंजगाव, भिमनगर वस्ती, दिनकर गायकवाड यांचे जवळ, ता. भोर, जि.पुणे) यास पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६(१) (अ)(ब) प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीतुन ०१ (एक) वर्षाकरीता तडीपार केले आहे.

चंदननगर पोलिस स्टेशन हद्दीतील वडगावशेरी, तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरिकांना वारंवार त्रास देणाऱ्या, दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण होऊ नये तसेच सदर सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सदर गुन्हेगारावर सहा पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, श्रीमती सीमा ढाकणे, चंदननगर पोलिस स्टेशन व पोलिस हवालदार ७७१३ शशिकांत गायकवाड, पोलिस शिपाई ८३६१ विकास कदम, पोलिस शिपाई ७०३० अनुप सांगळे यांनी सदर सराईत ईसम याचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसम यास महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर हिम्मत जाधव यांना प्रस्ताव पाठविला असता, हिम्मत जाधव यांनी सदर सराईतास पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीतुन ०१ (एक) वर्षाकरीता तडीपार केले आहे.

सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त, मनोज पाटील, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर हिम्मत जाधव, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग,
पुणे शहर, प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सीमा ढाकणे, चंदननगर पोलिस स्टेशन, पुणे शहर, पोलिस हवालदार ७७१३ शशिकांत गायकवाड, पोलिस शिपाई ८३६१ विकास कदम, पोलिस शिपाई ७०३० अनुप सांगळे यांनी केली आहे.

सदरचे तडीपार गुन्हेगारावर हा पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीत आढळुन आल्यास त्यांची माहिती चंदननगर पोलिस स्टेशन, पुणे शहर संपर्क क्रमांक ०२०-२७०१२३२१ यावर कळविण्याचे आवाहन चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, श्रीमती सीमा ढाकणे यांनी केले आहे.

पुणे! भारती विद्यापीठ पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांनी केले कौतुक!

पुणे! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्रांनी केला मोठा घात; धक्कादायक माहिती समोर…

पुणे शहरात रंग लावण्यावरून युवकावर कोयत्याने केले सपासप वार…

पुणे पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव केला उघड…

हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणाने घेतले धक्कादायक वळण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!