वन्यप्राणी खवले मांजराची तस्करी करणारे ताब्यात; किंमत सांगितली ३० लाख…

बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): वन्यप्राणी खवले मांजराची तस्करी करुन अवैध खरेदी विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांना 07/03/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन वन्यप्राणी खवले मांजर वाशिम जिल्ह्यातील एकाकडे असल्याचे कळाले व त्याची खरेदी विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. सदरील व्यक्तीला व्यापार करून विक्री करायची असल्याने के डी. नागरगोजे, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रा. जालना उत्तर यांनी बनावट खरेदीदार बनवून सदरील वन्यप्राणी खवले मांजर वे रु. 30 लक्ष देतो म्हणून जालना येथे बोलावून घेण्यात आले. श्रीजी हॉटेल समोर मंठा चौफुली जालना येथे सापळा रचण्यात आला त्यामध्ये SUZUKI ERTIGA MH-43 BP-4568 या वाहनातून 02 व्यक्ती उतरले. त्यानी TATA PUNCH MH-37 AD 9607 या वाहनाची डिक्की उघडुन विक्रीसाठी आणलेले खवले मांजर दाखविले.

बनावट खरेदीदार (वनपरीक्षेत्र अधिकारी प्रा. जालना उत्तर) यांनी खरेदी विक्रीसाठी आणलेले खवले मांजर वरील नमुद वाहनात असल्याची खात्री केली. त्यानंतर तेथून जवळ असलेल्या वन अधिकारी / कर्मचारी यांना वन्यप्राणी खवले मांजर असल्याचा इशारा केला व त्यानुसार सदरील वाहनामधील व्यक्तींना वन्यप्राणी खवले मांजरास नैसर्गिक अधिवासातुन पकडणे, अवैध वाहतुक करणे व अवैध खरेदी विक्री करणे या गुन्ह्यापोटी सदरील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना वनपरीक्षेत्र अधिकारी प्रा. जालना उत्तर कार्यालयात चौकशी कामी आणले.

सदर चौकशी दरम्यान आरोपी 1) संजय उकंडा राठोड, रा. गिरोली, ता.जि. वाशिम 2) सुनिल नामदेव थोरात, रा. चौडी ता. वसमत जि. हिंगोली 3) नारायण पुजाराम अवचार, रा. विडोळी ता. मंता जि. जालना 4) प्रताप गुलाबराव सरनाईक, रा. हिवरा ता. रिसोड 5) अनिल अशोक सावळे, रा. ढोरखेडा ता. मालेगाव जि. वाशिम या प्रमाणे आरोपींची नावे आहेत. त्यांनी चौकशी दरम्यान अजुन एक वाहन Hyundai i20 MH-14 BX 8737 हे मौजे मंठा येथून शासकिय विश्श्राम गृह (PWD) च्या आवारातुन ताब्यात घेऊन वनपरीक्षेत्र कार्यालयात आणले. सदर तपासा दरम्यान आणखी एक सह आरोपी एकनाथ अनिल इंगळे, रा. लाखला ता.जि. वाशिम यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेले ओळखपत्र तपासुन खात्री केली व सदरील आरोपींना भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 40 (2) 48 A, 49, 49 8, 50 (1) (c), 51 अन्वये गुन्हा दाखल करुन पुढील चौकशीस्तव ताब्यात घेण्यात आले. तसेच सदरील गुन्ह्यात वापरलेले वाहन अनुक्रमे 1) SUZUKI ERTIGA MH-43 BP. 4568 2) TATA PUNCH MH-37 AD 9607 3) Hyundai i20 MH-14 BX 8737 हे तिन्ही वाहन तसेच आरोपींचे मोबाईल वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 50 (1) (c) नुसार जप्त करण्यात आले आहे..

सदरची कारवाई प्रमोदचंद लाकरा, वनसंरक्षक (प्रा.) छत्रपती संभाजीनगर व सुवर्णा माने, उप वनसंरक्षक, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सु.न. मुंढे, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) जालना यांच्या नेतृत्वाखाली श्री के. डी. नागरगोजे, वनपरीक्षेत्र अधिकारी जालना प्रा. उत्तर, श्री व्ही. एम. दौड, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रा. जालना दक्षिण, कु. आर.डी. दुनगहु, वनपरीमंडळ अधिकारी बदनापुर, श्री वाय. एम. डोमळे, वनपरीमंडळ अधिकारी भोकरदन, श्री व्ही.पी. अवचार, वनपाल मंठा, श्री बी. एम. पाटील, वनपाल अंबड, श्री के. जी. शिंगणे, वनरक्षक अंबड, श्री मुटके, वनरक्षक मठजळगाव, श्री के.जी. कदम, वनरक्षक चिंचखेड, श्री के. बी. वाकोदकर, वनरक्षक मंठा, श्री डि.व्ही. पवार, वनरक्षक भोकरदन, श्री जे.टी. नागरगोजे, वनरक्षक जाफ्राबाद श्री बालाजी घुगे, वनरक्षक जालना, श्री महादेव कळमकर, वनक्षक काजळा, श्री सुदाम राठोड, वनरक्षक उज्जैनपुरी इत्यादी वनकर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

सोलापूरमध्ये युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या; गरम सळईने दिले चटके…

भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा महत्त्वाचे नियम…

खोक्या सापडला! प्रयागराजमधून सतीश भोसले याला पोलिसांनी केली अटक…

धक्कादायक Video: लातूरमध्ये युवकाला नग्न करून बेदम मारहाण…

तुळजापूर अमली पदार्थ रॅकेट! महिलेकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!