अमित शहा पुणे दौऱ्यावर! पुणे शहरातील वाहतूकीमध्ये केलेला बदल घ्या जाणून…

पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असल्यामुळे वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (शनिवार) प्रधानमंत्री आवास योजना -1 ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देणे व लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम महाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी स्टेडिअम येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवरती म्हाळुंगे गाव परिसरातील वाहतुकीत शनिवारी (ता. 22) बदल करण्यात येणार आहे, त्याचबरोबर पुणे शहरातील सर्व रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी असणार आहे, चांदे-नांदे-म्हाळुंगे गाव ते राधा चौक व राधा चौक ते म्हाळुंगे गाव येण्या-जाण्यास सर्व प्रकारच्या जड- अवजड वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. त्यामुळे, चांद-नांदे येथून येणारी वाहने गोदरेज सर्कल येथून डावीकडे वळून माण मार्गे हिंजवडी मार्गे इच्छित स्थळी जातील.

बालेवाडी जकात नाका व बाणेर हद्दीतून येणारी वाहने राधा चौकातून उजवीकडे वळून वाकड नाका मार्गे हिंजवडी मार्गे इच्छित स्थळी जातील. बालेवाडी स्टेडीयमकडील मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता हा शितळाई देवी चौक (पुणेरी स्वीट) ते महाळुंगे पोलिस चौकीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे चांदे नांदे व म्हाळुंगे गावातून राधा चौकाकडे जाणारी वाहने ही शितळाईदेवी चौक येथून उजवीकडे वळून महाळुंगे पोलिस चौकी येथून पुढे राधा चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. अमित शहा यांच्या या दौऱ्यामुळे बाणेर रस्ता व लष्कर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून (आचार्य आनंदऋषीजी चौक) बाणेर रस्त्यावरून राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकातून डावीकडे वळून पुढे जावे

मुंबई – बंगळूर बाह्यवळण महामार्गावरून बाणेरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी बालेवाडी जकातनाका चौकातून डावीकडे वळून हायस्ट्रीटमार्गे पुढे जावे

पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी विद्यापीठ चौकातून बाणेरकडे न जाता पाषाण रस्त्याने चांदणी चौक किंवा विद्यापीठ चौकातून औंधमार्गे पुढे जावे

लष्कर परिसरातील रेसकोर्सजवळील पाण्याची टाकी ते टर्फ क्लब रस्ता वाहतुकीस तात्पुरत्या स्वरूपात दुतर्फा करण्यात येणार आहे.

विद्यापीठ चौक ते चांदणी चौक, बाणेर रस्ता, विद्यापीठ चौक ते औंधमधील राजीव गांधी पूल या ठिकाणी अवजड वाहनांना बंदी असेल

दरम्यान, पुणे विद्यापीठ चौक ते चांदणी चौक-पाषाण रोड, पुणे विद्यापीठ चौक ते राधा चौक-बाणेर, पुणे विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पूल-औंध रोड या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड वाहनांना शनिवारी (ता. 22 ) रात्री बारा ते रविवारी (ता. 23) रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दिवसांचा ब्लॉक; पाहा वाहतूकीतील बदल…

पुणे शहरात ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहिम अन् वाहतूकीत तात्पुरता बदल…

Video: पुणे शहरात भर पावसात महिला पोलिस अधिकाऱ्याकडून वाहतूक नियंत्रण…

पुणे पोलिस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेणार गुगलची मदत…

पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!