
प्रसिद्ध युट्यूबरने सोशल मीडियावरून केली युवतीसोबत मैत्री अन् पुढे…
तिरुअनंतपुरम (केरळ): एका प्रसिद्ध युट्यूबरने सोशल मीडियावर मैत्री करून युवतीला आपल्या जाळ्यात ओढले. पुढे त्याने युवतीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी पीडितेनं आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी युट्यूबरला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मोहम्मद निशाल (वय २५) असे अटक झालेल्या युट्यूबरचे नाव आहे. पोलिसांनी शनिवारी त्याला अटक केली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी युट्यूबर मोहम्मद याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे पीडितेशी ओळख केली होती. याच ओळखीचा फायदा घेऊन त्याने पीडितेला आपल्या जाळ्यात ओढलं. यातूनच आरोपीनं पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओज शूट केले. फोटोजच्या आधारे आरोपीनं पीडितेला ब्लॅकमेल केलं. संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि पीडितेच्या पतीला संबंधित फोटो पाठवण्याची धमकी देत आरोपीने पीडितेवर दोन वेळा बलात्कार केला. शिवाय, सतत शरीरसुखाची मागणी करू लागला. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित युवतीने केरळच्या कलामस्सेरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पीडितेच्या तक्रारीवरून, कलामस्सेरी पोलिसांनी शनिवारी कोझिकोड येथून मोहम्मद निशालला अटक केली. अटकेनंतर युट्यूबरला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी युट्यूबरला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी यूट्यूबर मोहम्मद निशाल हा केरळातील प्रसिद्ध युट्यूबर आहे. सोशल मीडियावर त्याची मोठी फॅन फॉलोविंग आहे. आरोपीने अशाच प्रकारे इतरही काही युवतींना आपल्या जाळ्यात ओढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याअनुषंगाने पोलिस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक! नवरीला दिलं HIV संक्रमित इंजेक्शन…
दीराने वहिनीच्या बहिणींना पाठवले नको ते मेसेज अन् पुढे तर…
धक्कादायक! रिसॉर्टमध्ये युवतीने केला युवतीवर सलग तीन दिवस बलात्कार…
धक्कादायक! हनिमूनच्या रात्री सासरच्यांनी महिलेची तपासली व्हर्जिनिटी अन्…
धक्कादायक! पत्नीला पाच युवकांसोबत रंगेहाथ पकडले अन् पडला रक्ताचा सडा…

