गायक उदित नारायण यांचा आणखी एक किसिंगचा Video Viral…

मुंबईः प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते युवतीला किस करताना दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये उदित नारायण पुन्हा एकदा महिलांना किस करताना दिसत आहेत. नेटिझन्सनी उदित नारायण यांना ‘सीरियल किसर’ असे नावं दिले आहे.

उदित नारायण यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते लाईव्ह सिंगिग शोमध्ये महिला चाहत्यांना किस करत होते. महिला चाहत्या उदित यांच्यासोबत सेल्फी काढायला आल्या, त्यावेळी त्यांनी फॅन्सला किस केले. उदित नारायण यांनी काही महिला चाहत्यांना गालावर किस केले, तर एका युवतीच्या ओठांवर जबरदस्ती किस केले. संबंधित प्रकार कॅमेऱ्यात चित्रित झाला, त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले होते.

उदित नारायण यांचा आता दुसरा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते महिला चाहतीसोबत लिपलॉक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स उदित नारायण यांना ‘सीरियल किसर’ म्हणत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये काही महिला उदित यांच्याजवळ येऊन सेल्फी काढण्यासाठी स्टेजजवळ येतात. यावेळी उदित नारायण सेल्फि काढतात आणि एका महिला चाहतीसोबत लिपलॉकही करतात. सुरुवातीला ते महिलेच्या गालावर किस करतात, त्यानंतर ते ओठांवर किस करतात. संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Video: युवतीच्या ओठांचं चुंबन घेतल्यानंतर उदित नारायण म्हणाले…

अभिनेता सैफ अली खानने जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याची घेतली भेट…

अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या चालकाला अपघात प्रकरणी केली अटक…

प्रेम प्रकरण! अभिनेत्रीला पोलिसांनी घेतले ताब्यात…

अभिनेत्री प्रकरण! तीन IPS अधिकाऱ्यांचे निलंबन…

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घेतला घटस्फोटाचा निर्णय…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!