
धनंजय मुंडे यांना करुण शर्मा यांना द्यावी लागणार दोन लाख रुपयांची पोटगी…
मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणातील जी तक्रार केली होती. यावर वांद्रे फॅमिली कोर्टाने निर्णय दिला आहे. वांद्रे फॅमिली कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.’
दरम्यान, करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचारप्रकरणी आज वांद्रे कोर्टाने निकाला दिला असून करुणा शर्मा यांना महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेशात म्हटलं आहे. त्यामुळे, घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडेंना न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले. मात्र, आत्ताचा आदेश केवळ अंतरिम पोटगी देण्यासंदर्भात आहे. अर्जदाराची आर्थिक गरज लक्षात घेऊन न्यायलयाने हा निर्णय दिलेला आहे. धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारप्रकरणी दोषी असल्याचं न्यायालयाने कुठेही म्हटलं नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, धनंजय मुंडेंकडून या कोर्टाच्या निर्णायावर वकिलांमार्फत पहिली प्रतिक्रिया देण्यात आली.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांच्या अनुषंगाने किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवर काहीही निर्णय अद्याप दिलेला नसून, याबाबत काही माध्यमांवर दाखविण्यात येत असलेले वार्तांकन निराधार आहे. . केवळ अर्जदारांच्या आर्थिक गरजांच्या आधारावर हा आदेश करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपची कबुली दिली होती, ज्याच्या आधारावरच न्यायालयाने हा आदेश दिला आहे, असे वकील सायली सावंत यांनी माध्यमांना दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामध्ये, त्यांनी न्यायालयाच्या आदेशातील पॅराग्राम 25 चा दाखला देखील दिला आहे. दरम्यान, जानेवारी 1998 मध्ये धनंजय मुंडेंसोबत माझं लग्न झालं असून मला एक मुलगा व एक मुलगी असल्याचा दावा करुणा शर्मांकडून याचिकेत करण्यात आला आहे.
करुणा शर्मा यांनी वांद्रे फॅमिली कोर्टाच्या निर्णयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या, ‘कोर्टातून मला न्याय मिळाला, न्यायालय आणि न्यायाधीशांचे आभार मानते. मुलं सोबत असल्यामुळे तिघांना प्रत्येकी 5 लाख मिळतील अशी मागणी होती. मला दोन लाख मिळाले आहेत. माझ्या मागणीसाठी मी हायकोर्टात जाणार आहे. माझे पती यांचे वार्षिक उत्पन्न 65 कोटी आहे. त्या तुलनेत मला मिळणारी पोटगी ही खूपच कमी आहे. त्यामुळे मला पोटगी वाढवून देण्याची मी मागणी करणार आहे. महिलांना खूप त्रास आहे. गेली तीन वर्ष पोटगीसाठी लढत आहे, किती त्रास झाला हे सांगू शकत नाही. मंत्र्यासोबत माझी लढाई होती. माझ्या वकिलानं एक रुपया न घेता हा खटला कोर्टात दाखल केला. आज आमचा विजय झाला आहे. हा सत्याचा विजय आहे. माझ्या सोबत साधा वकील होता जो सत्याच्या सोबत होता. 1996 पासून नवऱ्यासोबत आहे, जशी जीवनशैली आहे त्याप्रमाणं पोटगी मिळावी अशी अपेक्षा होती ती मिळावी यासाठी हायकोर्टात जाणार आहे.’
करुणा मुंडे या फैमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी
करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च… pic.twitter.com/URrKRw6B7V
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 6, 2025
धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी उचललं…
वाल्मिक कराड याचा PSI सोबतचा फोन व्हायरल; मी बीड जिल्ह्याचा बाप…
बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण…
वाल्मिक आणि बीड पोलिसांची Audio क्लिप व्हायरल; सनीने सगळचं सांगितले…
तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या पोलिसांची नावं केली जाहीर! पाहा यादी…

