पुणे शहरात दोन सराईत गुन्हेगारांना अग्निशस्त्रांसह केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील युनिट ६च्या पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना अग्निशस्त्रांसह अटक केली असून, घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्हयांची उकल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

युनिट ६ कडील प्रभारी पोलिस निरीक्षक वाहिद पठाण व पथक असे ३१/०१/२०२५ रोजी फुरसुंगी पो.स्टे. हद्दीत गस्त करीत होते. पो.हवा. नितीन मुंढे यांना मिळालेल्या खबरीवरून आरोपी समीर उर्फ कमांडो हनीफ शेख (वय १९ वर्षे, रा. गल्ली नं. २३, सय्यदनगर, हडपसर, पुणे) यास गंगा नगर, फुरसुंगी, पुणे येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र, २ जिवंत काडतुसे, घरफोडीचे साहित्य आणि चोरीचे मो. सा. सह ताब्यात घेवून सदर आरोपीताविरूद्ध हडपसर ( फुरसुंगी) पो.स्टे. येथे गु.र.क्रं. १४८/२५, कलम ३, २५ आर्म अॅक्ट सह ३७(१) सह १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांचे आदेशाने सदरचा गुन्हा पुढील तपास कामी युनिट कडे वर्ग करण्यात आला होता. अटक आरोपीताकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याचे तसेच लोणी काळभोर व हडपसर ठाणे हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली. अटक आरोपीस अग्निशस्त्र व काडतुसे पुरवणारा अभिलेखावरील आरोपी यश मुकेश शेलार (वय २० वर्षे, रा. तरडे वस्ती, महंमदवाडी, पुणे) यास अटक करण्यात आली असून त्याचेकडुन एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र हस्तगत करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, पोलिस उप आयुक्त विवेक मासाळ (अति.कार्यभार – गुन्हे) सहा.पोलिस आयुक्त (गुन्हे -२) राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट -६ चे प्रभारी पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहा.पोलिस निरीक्षक मदन कांबळे, पोलिस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पो.हवा. बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, पो.अं. ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, पो.हवा. सुहास तांबेकर, मपोअं. प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…

धक्कादायक Video: पुणे शहरात वृद्ध महिलेला लुटण्यासाठी युवतीने काय-काय केले पाहाच…

पुणे! मंगळसूत्रचा अर्धवट भाग पुन्हा घेऊन जाणारा चोरटा जेरबंद…

पुणे शहरात सराईत घरफोडी व मोटार सायकल चोरी करणारा ताब्यात…

पुणे शहरात गाडी तोडफोडीचे सत्र सुरूच; रात्रीत 40 गाड्यांची तोडफोड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!