विद्येच्या माहेर घरात युवकासोबत तिघांनी केला विकृतीचा कळस…

पुणेः शिक्षणाचं माहेरघर समजले जाणारे पुणे शहरात एका युवकाबाबत धक्कादायक घटना घडली आहे. युवकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या गुप्तागाला बाम लावला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली होती. या पिडीत युवकाने हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत युवक (वय २०) मित्राला भेटण्यासाठी फ्लॅटमध्ये गेला होता. त्यादरम्यान राम तुळशीराम गंभीरे या (35 वय) आरोपीने पिडीत तरुणाच्या हातात सिगारेट दिली होती. मात्र ती सिगारेट तक्रारदार युवकाच्या हातामधून खाली पडली. त्यानंतर तक्रारदार युवकाने राम गंभीरे याला सिगरेट उचलून दिल्याने, राम गंभीरे याला राग आला. तू माझी बरोबरी करतो का? असे म्हणत आरोपी राम गंभीरे याने पिडीत युवकाला लाथाबुक्क्याने तसेच त्याच्या हातातील धातूच्या कड्याने बेदम मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर त्याच्या गुप्तांगाला आयोडेक्स बाम लावण्यात आला होता. विशेष म्हणजे या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आरोपींनी बनवून सोशल मिडीयावर व्हायरल केला होता.

या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून हिंजवडी पोलिसांनी श्रेयस संजय कवडे, ललित प्रमोद भदाणे आणि राम तुळशीराम गंभीरे या तीन आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…

पुणे शहरात गाडी तोडफोडीचे सत्र सुरूच; रात्रीत 40 गाड्यांची तोडफोड…

पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला मारण्यासा दिली १०० रुपयांची सुपारी…

Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू…

धक्कादायक! युवकावर अनैसर्गिक अत्याचार करून केली हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!