
‘प्रेमात माझी वाट लागली’, स्टेटस ठेवलं अन् घेतला जगाचा निरोप…
बीड : एकतर्फी प्रेमातून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडम जिल्ह्यातील चिंचवडगाव (ता. वडवणी) येथे घडली आहे. युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट लिहली आहे. माझ्या आयुष्यात गेल्या पाच-सहा महिन्यात जे घडलं आहे ते सत्य तुमच्यासमोर मांडून आयुष्य संपवत आहे, असे म्हणत युवकाने जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
उमेश शेंडगे पाटील (वय २८) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट आणि मुली सोबतचे फोटो, व्हिडिओ टाकले आहे. तसेच त्याच्या बाबतीत घडलेल्या संपूर्ण प्रकारची माहिती त्यांनी दिली आहे. पोस्टमध्ये अनेकांच्या प्रकरणाचा उल्लेख करत खळबळ उडून दिली आहे..
माझ्या आयुष्यात पाच/ सहा महिन्यात जे घडलं आहे ते सत्य तुमच्यासमोर मांडून आयुष्य संपवत आहे, असे म्हणत उमेशने पोस्ट लिहण्यास सुरूवात केली. या पोस्टमध्ये उमेशने अनेकांचा उल्लेख केला आहे. तसेच त्या व्यक्तींना गावापासून लांब ठेवा म्हणजे गाव आनंदात राहील, असे देखील उमेश म्हणाला आहे. तसेच आता माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला आयुष्यभर सजा भोगावी लागणारे आहे. खूप चांगल्या मुलांच आयुष्य अवघड आहे, अशा प्रेमात माझी वाट लागली आहे, असे देखील उमेश म्हणाला.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने जीवन संपवल्याचे स्टेटस ठेवले असल्याचे त्याच्या मित्र मंडळींकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यृची नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…
एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळलेल्या युवतीने घेतला जगाचा निरोप…
एकतर्फी प्रेम! बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची धमक्यांना कंटाळून आत्महत्या…
महाराष्ट्र हादरला! शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या…
एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…

