
नाशिकमध्ये पत्नीसोबत प्रवास करणाऱ्या पतीची धावत्या रिक्षातून पुलावरून उडी…
नाशिक : नाशिक शहरातील कन्नमवार पुलावरुन पत्नीसोबत रिक्षातून प्रवास करत असताना पतीने उड्डाण पुलावरून उडी घेत स्वत:चं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अधिक तपास आडगाव पोलिस करत आहेत.
पत्नीसोबत रिक्षात प्रवास करणाऱ्या पतीने धावत्या रिक्षातून पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तपोवन परिसरातील कन्नमार पुलावरून उडी घेतली आहे. आत्महत्या करणाऱ्याचे नाव चेतक पवार असून चेतकने पत्नीसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चेतकच्या आत्महत्येनंतर त्याची पत्नी देखील उड्डाण पुलावरून खाली आली आणि रडायला लागली. या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आले असून पतीच्या मृतदेहाशेजारीच पत्नी रडताना दिसून येते.
दरम्यान, ज्या रिक्षात बसून चेतक आपल्या पत्नीसोबत प्रवास करत होता, त्याच रिक्षातून जखमी चेतकला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, चेतकला गंभीर दुखापत झाल्याने अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, चेतकने आत्महत्या का केली? याचा तपास आडगाव पोलिस करत आहेत.
पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू…
नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला पोलिसाचा कापला गळा…
नाशिक शहरात घरामध्ये आढळला बाप-लेकाचा मृतदेह…
नाशिकमधील पोलिसाला हॉटेलमधील भोवली ‘भाईगिरी’…
नाशिकच्या रुग्णालयातून एमबीए महिलेने चोरलं बाळ; कारण…

