
पुणे शहरात युवकाची धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या…
पुणे: पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील आनंदनगर येथे युवकाची लोखंडी धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. करण गिरीश काशीद (वय १९, रा. धायरी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
सोमवारी (ता. १६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण हा सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर येथील अरविंद सोसायटीजवळील परिसरात थांबला होता. यावेळी तीन हल्लेखोर त्या ठिकाणी आले. काही कळण्याच्या आतच त्यांनी आपल्याजवळील लोखंडी धारदार हत्याराने करणवरती हल्ला चढवला. हल्लेखोरांनी करणच्या शरीरावर वर्मी घाव घातल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. भरवस्तीत हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत करण काशीद आणि आरोपींमध्ये पूर्वीचा वाद होता. याच वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी पथकासह घटनास्थळाची माहिती पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पुणे! मैत्रिणीने मेसेज करून भेटायला बोलावले अन् घरच्यांनी घेतला जीव…
पुणे जिल्ह्यातून बेपत्ता असलेल्या युवतीचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर…
पुणे! जुन्या वादातून गोळीबाराचा थरार! पिस्तूलासह दोघांना अटक…
पुणे! उच्चपदस्थ शासकीय अधिकारी अडकला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अन्…

