सासूने केलेल्या मारहाणीत जावयाचा जागीच मृत्यू…

बुलडाणा : शेगाव तालुक्यात सासूने केलेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सासूला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. दीपक गजानन हाडोळे असे मृत्युमुखी पडलेल्या जावयाचे नाव आहे.

शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे पत्नी तिच्या माहेरी गेली होती. पत्नीला भेटण्यासाठी कडे गेला असताना सासू आणि पत्नी दार उघडत नसल्याने जावयाने दारावर दगड मारले. यामुळे संतापलेल्या सासूने मागच्या दाराने येत त्याला बॅटने मारहाण केली. या मारहाणीत जावयाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शेगावमधील फुलेनगर येथे राहणाऱ्या दीपकचे जवळामध्ये राहणाऱ्या वैष्णवीसोबत लग्न झाले होते. मात्र दीपक गजानन हाडोळे याला दारुचे व्यसन होते. त्याची पत्नी ४-५ वर्षांपासून आई सुशीला यांच्याकडे राहत होती. दीपक २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास दारू पिऊन सासूच्या घरासमोर आला होता. सासूच्या घरासमोर येत दीपकने दरवाजावर लाथा मारल्या आणि शिवीगाळही करत होता. त्याने दगड मारून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पत्नी आणि सासू दरवाजा उघडत नसल्याने दीपक मोठ मोठे दगड दरवाजावर मारत राहिला.

जावई दारात येऊन शिवीगाळ करत दगड मारत असल्याने सासू सुशीला संतापल्या. त्यांनी पाठीमागच्या दरवाजाने बाहेर येत जावयाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर लाकडी बॅटने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जावयाचा जागीच मृत्यू झाला. दीपकची पत्नी वैष्णवी हिने या प्रकरणी आईविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सासूला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

अहमदनगर जिल्हा हादरला! जावयाने पत्नी, मेहुणा, आजे सासूची केली हत्या…

धक्कादायक! जावयाने धोंडे जेवणानंतर पत्नी आणि सासूचा केला खून अन् पुढे…

जावयाने तोडले सासूचे नाक अन् पुढे…

धक्कादायक! जावयाने पत्नीच्या संशयावरून आख्खी सासुरवाडी संपवली…

माझ्या बायकोचं अफेअर आहे म्हणत केली आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!