प्रेम! जवानाने मैत्रिणीला भेटायला बोलावले अन् निर्जन स्थळी घेऊन गेला…
नागपूर : लष्करात कार्यरत असलेल्या विवाहित जवानाने त्याच्या मैत्रिणीचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह जंगलात पुरला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला असून, आरोपी जवानाला अटक करण्यात आली आहे. आरोपी अजय वानखेडे याची ज्योत्सना आकरे हिच्याशी ओळख झाली होती. ज्योत्सनाचा घटस्फोट झाला होता. तिने दुसऱ्या लग्नासाठी विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तिथेच दोघांची ओळख झाली. त्यानंतर […]
अधिक वाचा...धक्कादायक! शिक्षकाच्या कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले, तिघांचे हात पाठीमागे…
नागपूर : नागपूरच्या मोवाड येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. विजय पचोरी, पत्नी बालाबाई पचोरी, गणेश पचोरी, दीपक पचोरी अशी मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने अनेक तर्क-वितर्क […]
अधिक वाचा...नागपूरवरून निघालेल्या बसला भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू…
भोपाळ (मध्य प्रदेश) : मैहर येथे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याकडेला उभा असलेल्या डंपरला शनिवारी (ता. २८) रात्री उशिरा धडकली. यावेळी झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, २४ जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस ही नागपूरवरून निघाली होती. राष्ट्रीय महामार्ग ३० वर हा अपघात झाला. बस प्रयागराजहून रीवा मार्गे नागपूरला जात होती. बस भरधाव वेगात […]
अधिक वाचा...शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच ‘आदर्श शिक्षका’ने घेतला अखेरचा श्वास…
नागपूर : विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना काटोल येथे घडली आहे. विजय धवड (वय ५७) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी सरकारकडून त्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कारही मिळाला होता. शिक्षक विजय धवड यांच्या निधनाने विद्यार्थ्यांसह अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. काटोल तालुक्यातल्या कोंढळी परिसरातल्या वाई शाळेत विजय धवड हे मुख्याध्यापक होते. […]
अधिक वाचा...नागपूरमध्ये स्वातंत्र्यदिनी पोलिस स्टेशनमध्ये डान्स करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे…
नागपूर : स्वातंत्र्यदिन पोलिस स्टेशनमध्ये डान्स केल्याप्रकरणी निलंबित तहसील पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पुन्हा त्यांच्या पदावर रुजू करून घेण्यात आले आहे. पुनर्स्थापनेनंतर त्यांची केवळ तहसील पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण झाल्यानंतर तहसील पोलिस ठाण्याच्या आवारात ‘खायिके पान बनारस वाला’ या गाण्यावर डान्स केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये एएसआय संजय […]
अधिक वाचा...नागपूर हादरलं! प्रियकर विवाहित तर प्रेयसी अनविवाहित अखेर…
नागपूर : प्रियकराने प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह जंगलात पुरल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील मानकापूर पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर महेश केशव वळसकर याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. महेश आणि प्रिया बागडी उर्फ प्रिया गुलक यांचे प्रेमसंबंध होते. प्रिया हिने महेशच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, महेश […]
अधिक वाचा...सुनेने सासूच्या हत्येची दिली सुपारी; चिमुकलीमुळे हत्याकांडाचा उलगडा…
नागपूर : संपत्तीच्या वादातून सुनेने सुपारी देऊन सासूला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनेसह तिच्या दोन भावांना अटक केली आहे. सुनेनं चुलत भावांना दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती. हत्येच्या ८ दिवसांनी हा सर्व प्रकार उघड झाला. पाच वर्षांच्या चिमुकल्या नातीने दिलेल्या माहितीमुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. सुनिता राऊत (वय 54) […]
अधिक वाचा...नागपूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसकाकाचा मृत्यू…
नागपूर : नागपूरमध्ये भीषण अपघातामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाने पीएसआय दीपक चोरपगार यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत पीएसआय दीपक चोरपगार यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मानकापूर उड्डाणपुलावर घडली आहे. दीपक चोरपगार […]
अधिक वाचा...Video: ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नाचणारे पोलिस कर्मचारी निलंबीत…
नागपूर: स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर तहसील पोलिस ठाण्याच्या आवारात ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नृत्याचा ठेका धरणारे दोन पोलिस कर्मचारी आणि दोन महिला अंमलदार अशा चारही पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. हे चारही कर्मचारी तहसील पोलिस ठाण्यातील आहेत. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटणकर, पोलिस हवालदार अब्दुल गणी, पोलिस शिपाई डॉली उर्फ भाग्यश्री गिरी, आणि […]
अधिक वाचा...नागपूरमध्ये ५५ वर्षाच्या व्यक्तीने चिमुकलीवर केला अत्याचार…
नागपूर : नागपूरच्या कामठी भागात आठ वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या शेजारच्यानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी आरोपी धनीराम वासनिक (वय ५५) याला बेड्या ठोकल्या आहेत. चल तुला चॉकलेट देतो, असे सांगत आरोपीने पीडित मुलीला आपल्या घरी नेले आणि तिथेच तिचा गैरफायदा घेतला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार […]
अधिक वाचा...
