पुणे शहरात घडली हादरवून टाकणारी घटना; गुन्हा दाखल…
पुणे: पुणे शहरातील पर्वती परिसरात हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय गतिमंद महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने केवळ अत्याचारच केला नाही, तर जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) सायंकाळी ५ वाजेच्या […]
अधिक वाचा...नाशिकमधील लैंगिक अत्याचार प्रकरण! आयटी कंपनी TCS कडून मोठा निर्णय…
नाशिक: नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू असलेल्या लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. या कंपनीच्या एचआर निदा खान अद्याप फरार असून, तिचा शोध सुरू आहे. आयटी कंपनीत अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर TCS कंपनीने आपलं कामकाज थांबवले आहे. नाशिकच्या टीसीएस कंपनीत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून झाडाझडती घेण्यात आली आहे. या कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना तूर्त सोमवारपासून Work […]
अधिक वाचा...अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या मोबाईलमध्ये आढळले Video; सहा अटकेत…
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्यासह आतापर्यंत सहा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत. संबंधित प्रकरण उघडकीस आल्यापासून पोलिसांनी अनेकांची धरपकड केली आहे. आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. यात मुख्य आरोपी मोहम्मद आयाज मोहम्मद […]
अधिक वाचा...प्रेमविवाहानंतर पत्नी निघून गेली अन् भाऊ पोहचेपर्यंत सगळं संपलं होतं…
सोलापूर: प्रेमविवाह केल्यानंतर किरकोळ वादातून युवकाने भावाला लोकेशन पाठवत गळफास घेतला. हिराजी मारुती देढे (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. सलगरवस्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील हिराजी देढे हा युवक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. काही महिन्यांपूर्वीच त्याचा प्रेमविवाह झाला होता. मंगळवारी त्याचा पत्नीसोबत किरकोळ वाद झाला. […]
अधिक वाचा...कोल्हापुरात व्यावसायिकाचे अपहरण अन् करंट देऊन केली अमानुष हत्या…
कोल्हापूर : एका व्यावसायिकाची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना दानोळी गावात घडली आहे. आरोपींनी २५ लाखांची खंडणी उकळण्यासाठी व्यावसायिकाचं अपहरण केले होते. मात्र, त्यानंतर पैसे न घेताच हल्लेखोरांनी करंट देऊन व्यावसायिकाला संपवले आहे. यानंतर त्यांनी एका शेतात व्यावसायिकाचा मृतदेह टाकून पळ काढला. भरतेश राजगोंडा टोपगोंडा असं हत्या झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी […]
अधिक वाचा...अमरावतीच्या मोहम्मदला अटक, १८० तरुणींचे लैंगिक शोषण अन् ३५० Video…
अमरावती : अमरावतीच्या परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर नावाच्या युवकाने अनेक युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर! आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याने १८० युवतींचे लैंगिक शोषण करून ३५० व्हिडिओ व्हायरल केल्याचा […]
अधिक वाचा...अमरावतीत तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, आरोपीवर गुन्हा दाखल…
अमरावती : परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरात अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिस ठाण्यात POCSO आणि BNS 294 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. परतवाडा शहरातील गटरमलपुरा परिसरातील एका युवकाने (वय १९) इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर युवती आणि महिलांचे अश्लील व्हिडीओ […]
अधिक वाचा...मुंबईत Live कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस, युवक-युवतीचा मृत्यू…
मुंबई: मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान ड्रग्जच्या ओव्हरडोसने दोन कॉलेज विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलातील हॉल क्रमांक ४ मध्ये ११ एप्रिल रोजी संध्याकाळी सुमारे ६ वाजता या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टला सुरुवात झाली होती. […]
अधिक वाचा...पंढरपूरमधील युवतीवरील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट…
पंढरपूर: पंढरपूर शहरात युवतीवर ॲसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी रात्रभर केलेल्या सखोल तपासानंतर युवतीवर कोणताही हल्ला झाला नसून, तिने स्वतःच हा ॲसिड हल्ल्याचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा सर्व प्रकार घरगुती वादातून आणि वैयक्तिक कारणातून घडला आहे. युवतीने स्वतःच घरातील टॉयलेट साफ करण्याचे ॲसिड घेतले आणि एका […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
पुणे: पुणे जिल्ह्यात कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचे आणि नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, त्याने तब्बल ५० लाख ५५ हजार रुपयांना लुटले आहे. या प्रकरणी भोंदूला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला (वय ४२) आणि तिचा पती कौटुंबिक […]
अधिक वाचा...
