रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
पुणे शहर पोलिस दलात अपर पोलिस आयुक्त (पूर्व विभाग) म्हणून कार्यरत असलेले रंजन कुमार शर्मा यांना शिक्षणाची मोठी आवड आहे. चार्टर्ड अकाउंटंट (सीए) झाल्यानंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी म्हणून पोलिस दलात दाखल झाले आहेत. श्री. शर्मा यांना सात भाषा अवगत असून, सध्या LLB चा कोर्स करत आहेत. प्राचार्य असलेल्या वडिलांकडून त्यांनी आयुष्यभर शिकत राहण्याचे धडे घेतले आहेत. रंजन कुमार शर्मा हे पोलिस दलात गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत असून, यांच्या वाटचालीविषयी थोडक्यात…

रंजन कुमार शर्मा यांचा बिहारमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. वडील प्राचार्य, तर आई गृहिणी म्हणून कुटुंबाकडे बारकाईने लक्ष देत. आईच्या कडक शिस्तीमुळे दोन्ही भाऊ आणि दोन बहिणींना संस्काराबरोबरच उच्च शिक्षण मिळाले. वडिलांची इच्छा म्हणून ते चार्टर्ड अकाऊंटट (सीए) झाले. पण, लहानपणापासून सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असल्यामुळे यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. सीए झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी झाले. पोलिस अधिकारी झाल्यानंतर जमिनीवर आणि कायद्याच्या चौकटीत राहून सर्वसामान्य नागरिकांना जेवढी मदत करता येईल, तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. सातत्याने नवनवीन शिकण्याची आवड असल्यामुळे त्यांच्याकडे माहिती खजिना आहे.

बालपण…
रंजन कुमार शर्मा यांचा जन्म बिहार राज्यातील केसोपूर (ता. झाझा, जि. जमुई) गावामधील. गावामधील के.एच.बी हायस्कूलमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अकरावी, बारावी देवधर येथे, तर बी.कॉम.ची पदवी पाटणा येथून घेतली. वडील प्राचार्य असल्यामुळे घरामध्ये शैक्षणिक वातावरण होते. लहानपणापासूनच वाचनाची सवय लागली होती. पुढे या सवयीचा स्पर्धा परीक्षा देताना मोठा फायदा झाला. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्यामुळे कोणतीही परीक्षा देताना अवघड असे काहीच वाटले नाही. अभ्यासाच्या जोरावर त्यांनी यश मिळवले आहे.

चार्टेड अकाऊंटट (सीए) ते आयपीस अधिकारी…
प्राचार्य असलेल्या वडिलांना आपल्या मुलाने चार्टेड अकाऊंटट (सीए) व्हावे, अशी इच्छा होती. रंजन कुमार शर्मा यांनी वडिलांच्या इच्छेखातर अभ्यासाच्या जोरावर सीए होऊन दाखवले. २००२ साली आपला मुलगा सीए झाल्याचे समजल्यानंतर वडिलांसह कुटुंबियांना मोठा आनंद झाला होता. रंजन कुमार शर्मा यांनी सीए झाल्यानंतर गुजरातमध्ये इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर म्हणून कामाला सुरवात केली होती. पण, शिकण्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिवाय, पोलिस दलाचे आकर्षण असल्यामुळे आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. गुजरातमध्ये नोकरी करत असताना चार मित्र एकत्र अभ्यास करायचे. नोकरी आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यासामुळे सुरुवातीला अपयश आले. पुढे २००६ मध्ये आयपीएस अधिकारी होऊन त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.

पुस्तक वाचनाच्या आवडीमुळेच आयपीस अधिकारी…
रंजन कुमार शर्मा यांच्या कुटुंबामध्ये शैक्षणिक वातावरण असल्यामुळे घरामध्ये विविध विषयांची पुस्तके असायची. लहानपणापासून वाचनाची आवड लागली होती. विविध पुस्तके वाचल्यामुळे ज्ञानात मोठी भर पडत होती. अनेकदा त्यांनी दिव्याच्या प्रकाशात पुस्तके वाचून काढली आहेत. एखादे पुस्तक हातात घेतले तर ते वाचून झाल्यानंतरच खाली ठेवायची सवय लागली होती. या सवयीमुळे वेगाने वाचनाची सवय लागली होती. पुढे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पुस्तके वाचून होत. पुस्तक वेगाने वाचनाच्या सवयीमुळे यूपीएससी परीक्षा देत असताना मोठा फायदा झाला. खरं तर या सवयीमुळेच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालो, असे रंजन कुमार शर्मा सांगतात.

सात भाषा अवगत…
रंजन कुमार शर्मा यांना लहानपणापासून वाचनच्या आवडीबरोबरच इतर भाषा शिकण्याची आवड होती. संस्कृत, हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, बंगाली आणि भोजपुरी या सात भाषा अवगत आहेत….

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl


पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!