अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)

अश्विनी पाटील या गेल्या १२ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पुणे शहर पोलिस दलातील सामाजिक सुरक्षा विभागात सध्या त्या सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. कर्मवीर स्पर्धा परिवार प्रबोधिनी येथे एमपीएससीचा क्लास लावला होता. फक्त आठ महिने रात्रंदिवस अभ्यास करून जिद्दीच्या जोरावर त्यांनी यश खेचून आणले आहे. त्यांच्याविषयी थोडक्यात…

अश्विनी पाटील यांचा जन्म मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नेर्ले हे त्यांचे गाव. वडील शिक्षक. लहानपणापासून प्रचंड वाचनाची आवड. आजपर्यंत किमान १४ हजार पुस्तके त्यांनी वाचली आहेत. यावरून त्यांच्या वाचनाची आवड दिसून येते. शेतकरी कुटुंबातील जन्म असल्यामुळे शेतीसह जनावरांच्या धारा काढण्यापासूनची सर्व मेहनती कामे त्यांनी लहान वयापासून केली आहेत. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्या वेळी असलेल्या जिल्हाधिकारी मनीषा म्हैसकर यांच्याविषयी दैनिकांमध्ये वाचायला मिळाले आणि आपणही एक अधिकारी व्हावे, असा विचार मनात आला. स्पर्धा परीक्षेसाठी फक्त आठ महिने रात्रंदिवस अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात रुजू झाल्या. पण, यश हे एका दिवसात मिळत नसते. त्यामागे मोठा त्याग असतो. शाळेत असल्यापासून पेपर वाचन आणि रेडिओवरील ऐकलेल्या बातम्यांचा त्यांना एमपीएससी परीक्षेदरम्यान मोठा फायदा झाला आहे, असे अश्विनी पाटील सांगतात.

बालपण…
अश्विनी पाटील यांचे बालपण नेर्ले गावात गेले. मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातील जन्म. वडील शिक्षक, तर आई गृहिणी. आजीला शिक्षणाचे प्रचंड वेड असल्यामुळे कुटुंबातील सर्वजण उच्चशिक्षित. वडिलांना समाजसेवेची आवड तर आईकडून जिद्द आणि चिकाटीचा गुण आला आहे. सर्वेसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांची जडणघडण होती. शिक्षण घेत असतानाच स्वतःला मुलगी न समजता मुलांप्रमाणेच खेळ खेळायच्या. लहानपणापासूनच प्रचंड जिद्दी होत्या. कोणत्याही कामामध्ये शेवटपर्यंत हार मानायची नाही, ही जिद्दच त्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी फायद्याची ठरली. आव्हान स्वीकारायला आवडायचे. लहानपणीच आजीने पोहायला शिकवले. शाळेत असतानाच दुचाकी चालवायच्या. कराटेचे प्रशिक्षण घेतले. घरातील सर्व कामे करण्याची सवय लहानपणापासूनच लागली होती. शिवाय, कुटुंबामध्ये सर्व जण उच्चशिक्षित असल्यामुळे वाचनाची आवड लहानपणापासूनच होती. पदवी हातामध्ये आल्यानंतर एमपीएससी परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाल्या.

शिक्षण..
१ ते ७ – कन्याशाळा, नेर्ले
८ ते १० – काळमवाडी
११ ते १२ – ज्युनिअर कॉलेज, नेर्ले
एफवाय ते टीवाय – इस्लामपूर
२०१० – एमपीएससी परीक्षा

आजोबा इंग्रजांच्या काळात पोलिस दलात…
अश्विनी पाटील यांचे आजोबा यशवंत बाबासाो पाटील इंग्रजांच्या काळामध्ये पोलिस दलात नोकरी करत होते. जुन्या काळातील ७वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले होते. आजोबांनी काही वर्षे पोलिस म्हणून नोकरी केल्यानंतर पुढे राजीनामा दिला आणि शेती व्यवसायाकडे वळले. आजोबांना संस्कृत, उर्दू भाषा येत असे. शिवाय, पेपर वाचनाची आवड होती. आजोबांनी मुलं आणि नातवांना वाचनाची सवय लावली. या सवयीचा फायदा सर्वांनाच झाला.

आजोबांचे स्वप्न पूर्ण…
अश्विनी पाटील यांचे आजोबा अश्विनी यांना लहानपणापासून ‘फौजदार’ या टोपण नावाने बोलवायचे. बहुधा, पोलिस दलातील फौजदार होण्याचे त्यांचे स्वप्न आपल्या नातीने पूर्ण करावे, अशी इच्छा असेल. फौजदार आणि अश्विनी हे लहानपणापासून एक समीकरण झाले होते. अश्विनी यांच्या कानावर सतत फौजदार हा शब्द पडायचा. पदवीची परीक्षा दिली आणि रात्रंदिवस अभ्यास केला आणि आजोबांचे फौजदार होण्याचे स्वप्न नातीने पूर्ण केले.

एमपीएससी परीक्षा…
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तत्कालीन जिल्हाधिकारी मनीषा म्हैसकर यांच्याविषयी दैनिकांमध्ये अनेकदा वाचायला मिळायचे. आपणही एक अधिकारी व्हावे, असा विचार मनात आला होता. पण, डॉक्टर, इंजिनिअर व्हायचे नाही, हे अगोदरपासूनच ठरवलेले होते. एमपीएससी परीक्षेसाठी वाचन आणि ज्ञान आवश्यक असते, हे माहीत होते. लहानपणापासून वाचन होत असल्यामुळे पाया अगोदरच रचलेला होता. फक्त परीक्षा देणे बाकी होते. एमपीएससी परीक्षा देण्याचे ठरल्यानंतर हातामध्ये फक्त आठ महिने बाकी होते. पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण व्हायचे, हे ठरवले आणि तयारीला लागल्या. आठ महिन्यांत रात्रंदिवस अभ्यास सुरू केला. दिवसभरातील फक्त ३-४ तासच झोप घ्यायच्या. अखरे, एमपीएससी परीक्षा दिली. निकाल हाती आल्यानंतर ठरवल्याप्रमाणे झाले होते. पहिल्या प्रयत्नातच यश अक्षरशः खेचून आणले होते. स्वतःसह कुटुंबीयांचे फौजदार होण्याचे स्वप्न पूर्ण केले. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षे पोलिस उपनिरीक्षक झाल्या होत्या.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’


पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!