दोघे वृद्ध भाऊ बेसावध असताना माथेफिरूने हल्ला करत घेतला जीव…

पालघर : पालघर येथे दोन भावांचा निर्घृणपणे खून करण्यात आल्यामुळे परिसरात तणावाचे आणि भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. बोईसरच्या कुडन भागात धारदार शस्त्राने वार करुन दोन भावांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. पोलिसांना या घटनेची माहिती शेजारच्या लोकांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आरोपीला पोलिसांनी नाल्याच्या चिखलातून शोधून काढून ताब्यात घेतले आहे. माथेफिरू आरोपीने धारदार शस्त्राने वार करून दोन भावांची निर्घृण हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.

भीमराव पाटील आणि मुकुंद पाटील अशी या दोन्ही वृद्ध मृतांची नाव आहेत. दोन्ही भाऊ बेसावध असताना या माथेफिरूने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. यावेळी बाजूला राहणाऱ्या रुपेश पाटील आणि त्यांच्या वडिलांनी बेसावध असणाऱ्या मारेकऱ्याच्या हातातून धारदार शस्त्र काढून घेतले. त्यानंतर मारेकऱ्यांने जंगलात पळ काढला होता.

पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिकांच्या मदतीने या मारेकऱ्याला एका नाल्याच्या चिखलातून शोधून ताब्यात घेतले आहे. हत्येचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून तारापूर पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

‘Jennifer And The Beast’ पुस्तक Online खरेदी करा…

भांडाफोड! मद्याच्या तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर…

संतापजनक! अल्पवयीन गतीमंद मुलगी सहा महिन्यांची गरोदर…

प्रेयसीची गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपीचाही जंगलात शेवट…

शिक्षकाने स्वतःच्या जागी ठेवला रोजंदारीवर निवृत्त शिक्षक; वर्गातच जुगार…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!