
नाशिकमध्ये Digital Arrest च्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक…
नाशिक : नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या (Digital Arrest) माध्यमातून एका ज्येष्ठ नागरिकाला 6 कोटी रुपयांना तर दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाला 72 लाख रुपयांना फसविल्याची घटना घडली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील फोटो व्हायरल झाल्याचे सांगत डिजिटल अरेस्ट केले आणि हे पैसे उकळले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
सायबर चोरट्यांनी दोन्ही घटनेत भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात ऑनलाइन हजर करत असल्याचे भासवले आणि भीती दाखवून हे पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमध्ये घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे भरण्यास भाग पाडले आहे.
नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला एक व्हिडीओ कॉल आला. त्याच्या सिमकार्डच्या माध्यमातून अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्याचे सांगितलं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे तो ज्येष्ठ नागरिक घाबरला. त्या परिस्थितीचा फायदा उचलून त्याला 6 कोटी रुपये ट्रान्सफर करायला भाग पाडले.
दुसऱ्या एका प्रकरणात ज्येष्ठ नागरिकाला 72 लाख रुपयांना फसविण्यात आले. तुमच्या आधारकार्डवरून क्रेडिट कार्ड इशू झाले असून त्या माध्यमातून गैरव्यवहार झाला आहे, अशी भीती घालण्यात आली. त्यामुळे 72 लाख रुपयांचा दंड भरला नाही तर सीबीआयचे पथक अटक करून दिल्लीला घेऊन जातील, अशी दमबाजी करण्यात आली. त्यामुळे 72 लाख रुपये आरटीजीएस केले. या दोन्ही प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास सुरू आहे.
IPS विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून 78 लाख रुपयांना लुटलं…
Digital Arrest! IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; कोटींचा गंडा…
पुणे! फेक प्रोफाईल तयार करून महिलेला कोट्यावधी रुपयांना फसवलं…
लग्नाळू आजी-आजोबांची उतारवयात बहरली लव्ह स्टोरी अन् एक दिवस…
Cyber Crime! पुणे शहरात सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस…
पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
Cyber Crime! ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणारे ताब्यात…
पुणे शहरात बनावट नोटा छापणा-या टोळीचा सायबर पथकाकडून पर्दाफाश…
सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…
Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…
Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…
Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…