नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…

नाशिक: ‘अध्यात्म’ आणि ‘धार्मिक सल्ल्या’च्या नावाखाली महिलांचं शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात खरात विरोधात लैंगिक शोषणाचा सातवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एका युवतीने आधी खरातच्या ‘ऑफिस बॉय’वर तक्रार केली होती, मात्र आता स्वतः खरातनेच तिचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप तिने केला आहे.

तक्रारदार युवतीची अशोक खरात याच्या सोबतची ओळख तिच्या कुटुंबाच्या माध्यमातून झाली होती. शेतात घर बांधण्यापूर्वी धार्मिक सल्ला घेण्यासाठी ही युवती आपल्या आई-वडिलांसोबत खरातकडे गेली होती. याच ओळखीचा फायदा घेत खरातने तिला आपल्या जाळ्यात ओढलं. पीडितेच्या आरोपानुसार, जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या सहा महिन्यांच्या कालावधीत अशोक खरातने तिचं वारंवार लैंगिक शोषण केले.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

इतर पीडितांप्रमाणेच या युवतीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. धार्मिक विधी किंवा सल्ल्याच्या बहाण्याने बोलावून, अमली पदार्थाचा वापर करून महिलांचा फायदा घेतल्याचे याही प्रकरणात घडल्याचं दिसत आहे.

विशेष म्हणजे पीडित युवतीने यापूर्वी शिर्डी पोलिस ठाण्यात अशोक खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. नीरजने तिचे अश्लील फोटो बनवून तिला पाठवले आणि त्रास दिला, असा आरोप तिने केला होता. मात्र, आता तपासात आणि पीडितेच्या नवीन जबानीनुसार, या संपूर्ण प्रकरणामागे अशोक खरात याचाच हात असल्याचे समोर आले आहे. खुद्द खरातनेच तिचे शोषण केल्याने तिने आता सरकारवाडा पोलिसांत धाव घेतली आहे.

दरम्यान, एकापाठोपाठ एक सात गुन्हे दाखल झाल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. उच्चभ्रू वस्तीत कार्यालये थाटून धार्मिक सल्ल्याच्या नावाखाली चालणाऱ्या या काळ्या कृत्यांचा पोलिसांनी आता कसून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील पीडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…

नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…

अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…

नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…

नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…

नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…

नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…

नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…

नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…

कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!