ऐश्वर्याला जाग आली तेव्हा तिला जमिनीवर नव्याश्री दिसली अन्…

बंगळुरू: महिला डान्स टिचर नव्याश्री (वय २८) या महिलेचा तिच्या नवऱ्याने तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खुनाची ही घटना केंगेरी येथील राहत्या घरी घडली. या प्रकरणी पोलिसांनी नव्याश्रीचा पती किरण ए. (वय 31) याला अटक केली आहे.

नव्याश्रीचा खून करण्यापूर्वी किरणने तिला खुर्चीला बांधून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. हत्येच्या वेळी नव्याश्रीची मैत्रीण ऐश्वर्याही तिच्याबरोबर होती. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्याला जाग आली तेव्हा तिला जमिनीवर नव्याश्री हिचा मृतदेह दिसला. घाबरून तिने ओरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले. ऐश्वर्याने लगेच पोलिसांना बोलावले होते. यानंतर पोलिसांनी नव्याश्रीचा पती किरण याला अटक केली आहे.

नव्याश्री आणि ऐश्वर्याने रात्री बिअर प्यायल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यानंतर दोघीही गाढ झोपल्या होत्या. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास किरणने स्वत:कडील चावीने घरात प्रवेश केला आणि नव्याश्रीचा गळा दाबून पळ काढला होता. नव्याश्री आणि किरणच्या प्रेम विवाहाला तीन वर्षे झाली होती. किरण हा टॅक्सीचालक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून दोघांमध्ये सतत भांडणे होते होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अभिनेत्रीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन अभिनेत्यांविरोधात गुन्हा दाखल…

पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…

हृदयद्रावक! आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह तलावात आढळले…

प्रेमविवाहानंतर दाजीने केला एकुलत्या एका मेव्हण्याचा खून…

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!