
अशोक खरात प्रकरणी नाशिक न्यायालयाचा मोठा निर्णय…
नाशिक : महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात नाशिक न्यायालयासमोर अशोक खरात याला आज (मंगळवार) दुपारी हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी अशोक खरात याच्या ७ दिवासांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. दुसऱ्या बाजूला खरातच्या वकिलांनी पोलिस कोठडी वाढविणे गरजेचे नसल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
युवतीवर लग्नाआधी आणि लग्नानंतर खरातने नाशिक येथील त्याच्या कार्यालयात अत्याचार केले. याविरोधात पीडितेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर खरात यास अटक झाली. महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्या विरुद्ध तक्रार करणाऱ्या महिलांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत अशोक खरात याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक पोलिसांच्या आवाहनानंतर अनेक पीडित महिला तक्रारीसाठी पुढे येऊ लागल्या आहेत. खरात याची पोलिस कोठडी आज संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी वाढवली.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
विशेष पोलिस पथकातील अधिकारी सूर्यवंशी यांनी न्यायालयाला खरात याच्यासंदर्भाने माहिती दिली. अशोक खरात हा स्वत:ला सिद्ध पुरूष म्हणवून घ्यायचा. येणाऱ्या महिलांना तो पेढा आणि विशेष प्रकारचे पाणी प्यायला द्यायचा. ६ लाख ५३ हजारांची रोकड आणि लॅपटॉप जप्त केला, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. तसेच खरात याच्या फार्महाऊसवर पिस्तुलाच्या ५ पुंगळ्या सापडल्याचेही त्यांनी सांगितले. खरातने नरबळी दिल्याचा संशयही सरकारी वकिलांनी न्यायालयात उपस्थित केला. खरात वाघ आणि साप लोकांना दाखवून त्यांच्या मनात भीती निर्माण करायचा. हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी लोकांना द्यायचा. खरात प्रकरणी वन कायदा देखील लागू शकतो, असे न्यायालयाच्या निर्दशनास सरकारी वकिलांनी आणून दिले. ईशानेश्वर मंदिरातील सिद्धपूजेचा तपास बाकी असल्याचे सांगत सरकारी वकिलांनी खरातला सात दिवसांची पोलिस कोठडी द्या, अशी मागणी केली. खरात नेमकी कोणती पूजा करायची, विधी कसे आणि कोणते होते, याची चौकशी करणे बाकी असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.
खरात प्रकरणात पेन ड्राईव्हचा कुठेही उल्लेख नाही. एसआयटीचा तपास झाला आहे. त्याच्याकडून कोणतेही कागदपत्रे हस्तगत करण्याचे बाकी नाही. त्यामुळे खरातला पुन्हा पोलिस कोठडी वाढविण्याची गरज नाही, असे खरातच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…
नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…
फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

