पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा…

पुणे : लोणी काळभोर येथील एमआयटी कॉर्नरजवळ विद्यार्थ्याच्या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

लोणी काळभोरच्या MIT महाविद्यालयाच्या खानावळीत विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाला. त्यानंतर हा वाद रस्त्यावर आला आणि रस्त्यावरच या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आणि समज देऊन सोडले आहे. विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद झाला असता तर त्यांच्या करिअरवर परिणाम झाला असता. त्यामुळे पोलिसांनी केवळ समज देऊन त्यांना सोडल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, लोणी काळभोर जवळ शैक्षणिक संकुल आहे. या संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. या परिसरात वादाच्या घटना नेहमीच होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

धक्कादायक! पुणे शहरात हॉर्न वाजवल्यावरून तिघांना फायटर सारख्या शस्त्राने मारहाण…

पुणे शहरात भररस्त्यात पोलिसाला युवकाने केली मारहाण…

Video: पुणे! IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदा हिच्या हत्येबाबत आरोपी म्हणाला…

पुणे शहरात गुंडाची रॅली काढणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई; काढली धिंड…

पुणे! विद्येच्या माहेरघरात मुलींचे कपडे बदलतानाचे Video रेकॉर्डिंग…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!