
परभणी हिंसाचार! तीन पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश…
परभणी : परभणीत संविधान विटंबना झाली यानंतर जो काय प्रकार घडला, हे प्रकार घडत असताना पोलिस प्रशासनाने जी दक्षता घ्यायला पाहिजे होती ती घेण्यात आली नसल्याची कबुली राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड धर्मपाल मेश्राम यांनी परभणीत दिली आहे. तसेच या प्रकरणामधील जनतेचा रोष असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
ऍड. धर्मपाल मेश्राम हे आज परभणी दौऱ्यावर होते. त्यांनी संविधान विटंबना घटनास्थळी भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनाही भेट दिली. यानंतर पोलिस आणि जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन सर्व परिस्थीचा आढावा घेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे.
पोलिसांनी ज्या पद्धतीने या प्रकरणात काळजी घ्यायला होती, ती घेण्यात आली नाही. तसेच ज्या तीन पोलिस अधिकाऱ्यांवर सामान्य जनतेचा रोष आहे, त्यांनाही तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना ही विना FIR मदत देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
दरम्यान, परभणीमधील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार काही दिवसांपुर्वी समोर आला होता. त्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. संतप्त जमावाने एसटी बसवरही दगडफेक केली होती. दरम्यान या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसानी रचलेल्या ट्रॅपमध्ये पोलिसच अडकले; पीएसआयसह पाच जणांना अटक…
हृदयद्रावक! पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप…
बदलापूर अत्याचार प्रकरणात कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका…
Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…
IPS अधिकाऱ्याची पत्नी आमदार मेघना बोर्डीकर यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी…

